Sunday, November 11, 2018

वार्षिक सर्वसाधारण सभा - सन २०१८ - चे इतिवृत्त


वार्षिक सर्वसाधारण सभा - कणकवली नाभिक मंडळ ,
इतिवृत्त- ६ ऑक्टोबर २०१८
शनिवार दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ रोजी ठिक ३. १५ वाजता
कणकवली तालुकाध्यक्ष मा. श्री. लक्ष्मिकांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली
अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी कणकवली तालुका नाभिक
महामंडळाची वार्षिक सर्वसाधारणसभा संपन्न झाली. त्यावेळी व्यासपीठावर
राज्य उपाध्यक्ष मा. श्री. विजय चव्हाणसाहेब, जिल्हाध्यक्ष मा. श्री. अनिल
अणावकरसाहेब, जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. चंद्रकांत चव्हाण, जिल्हा सल्लागार
मा. श्री. सुभाष चव्हाण, जिल्हा खजिनदार मा. चंद्रशेखर चव्हाण,

जिल्हा सचिव मा. श्री. सुधीर चव्हाण, कणकवली तालुका महिला अध्यक्षा
मा.श्रीम.संजना चव्हाण, मालवण तालुका अध्यक्ष मा. श्री. आनंद आचरेकर
इ. सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.

तालुकाध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत चव्हाण यांच्या हस्ते संत सेना महाराजांच्या
मूर्तीलापुष्पहार अर्पणकरण्यात आला. त्यानंतर सभेला सुरुवात झाली.
कै. आनंद पांडुरंग चव्हाण व कै. पंढरीनाथचव्हाण यांना संघटनेकडून
भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे
गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मागील सभेचे इतिवृत्त वाचून
दाखवण्यात आले. सदर इतिवृत्तास सर्वानुमते मंजुरी घेण्यातआली.
त्यानंतर संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त जमा झालेल्या रकमेचा
तपशीलवार हिशेब देण्यात आला.एकूण जमा रक्कम ४४,४०० रुपये
इतका असून त्यापैकी ११,१०० रुपये वार्षिक सदस्यत्व वर्गणी जमा
असल्याचे सांगण्यात आले. पुरुष सभासद १३२ व महिला सभासद ९०
झाल्याचे सांगण्यात आले. सर्व नवीन सदस्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन
करण्यात आले. पुण्यतिथीनिमित्त झालेल्या खर्चाचे तपशीलवार वाचन
करण्यात आले. सर्व जमा खर्चास सभागृहाची सर्वानुमते मंजुरी घेण्यात
आली. त्यानंतर पुढील विषय म्हणजेच ड्रेसकोडविषयी सविस्तर चर्चा
करण्यात आली.ड्रेसकोडसाठीचा लोगो निवडण्यात आला. सदर लोगो
१० रुपयांना १ याप्रमाणे मंडळाकडून खरेदी करण्यासाठी विनंती करण्यात
आली. त्यासंदर्भात प्रत्येक विभागीय अध्यक्ष्यांनी आपल्या विभागामध्ये
लागणाऱ्या लोगोंची संख्या कळवण्याबाबत सांगण्यात आले.मरून कलरचा
शर्ट, टी- शर्ट यावर लोगो लावून आपण सर्वांनी दिवाळीच्या मुहूर्तावर
आपल्या ड्रेसकोडला सुरुवात करण्याविषयी सांगण्यात आले. २५० रु /३०० रु
, पर्यंत आयते शर्ट मिळाल्यासआपण उपलब्ध करून देण्याची सोय करतो
असे अनिल अणावकर यांनी सांगितले. प्रतापगड येथील अखिल भारतीय
जिवा सेना संघटनेचे आपणास आमंत्रण असून त्या कार्यक्र्मासाठी
कणकवलीतून इच्छुक नाभिकांची नावे देण्याबाबत आवाहन करण्यात
आले. तो कार्यक्रम ९ ऑक्टोबर रोजी समारंभपूर्वक होणार असून त्यामध्ये
३ निराधार नाभिक मुलींना कन्यादान योजनेंतर्गत १०,००० रुपयांची अनमोल
अशी देणगी देण्यात येते. आपल्या सिंधुदुर्गातून देखील अशा मुलींची नावे
दिल्यास या योजनेचा आपल्याही मुलींना लाभ मिळू शकतो असे सांगण्यात
आले. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यातील निराधार मुलींनाही आपण
संघटनेकडून काही रोख स्वरुपात मदत करता येईल का यासाठी विचार
करण्यात येईल असे सांगण्यात आले. आपले स्वतःचे ओळखपत्र असावे
याकरिता फॉर्म तयार करण्याचे ठरविण्यात आले.त्यामध्ये संपूर्ण नाव, गाव,
पत्ता,आधार नंबर, रक्तगट, फोटो , संपर्क क्रमांक इत्यादी त्यामध्ये असायला
हवे असे ठरले. त्याप्रमाणे फॉर्म तयार करण्यात येऊन सर्व सदस्यांना
ओळखपत्रे बनवण्याचा मानस सांगण्यात आला.त्यानंतर कणकवली तालुका
नाभिक महिला मंडळ स्थापन करण्याचा हेतू स्पष्ट करण्यात आला. यावर
नूतन महिला अध्यक्षा मा.सौ. संजना संजय चव्हाण यांनी आपले मनोगत
व्यक्त केले. आपण दिलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी
प्रयत्नशील राहीन असे त्यांनी सांगितले.सचिव म्हणून सौ.ईश्वरी प्रवीण कुबल
यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. खजिनदार म्हणूनकुमारी हेमांगी
अणावकर यांची निवड करण्यात आली. एकाच वेळी दोन्ही सभा लावल्यास
बरे होईल, अशी चर्चा झाली. कोणते कार्यक्रम करावेत या संदर्भात थोडक्यात
चर्चा झाली. तरीही महिला मंडळाने आपणहून ठरवून यामध्ये भर घालून
कणकवलीचा वेगळा ठसा उमटावा यासाठी नवनिर्वाचित महिला मंडळाला
शुभेच्छा देण्यात आल्या.त्यानंतर कणकवली नगर पंचायतचे नगराध्यक्ष
मा.श्री. समीरजी नलावडेसाहेब यांच्याकडे देणार असलेले निवेदन वाचण्यात
आले. सदर निवेदन देताना सर्वांनी त्यांच्या घरी जाऊन निवेदन
देण्याचे ठरले.निवेदनाच्या पत्रावर सर्वांनी आपल्या सह्या केल्या. मान्यवरांनी
आपले मनोगत व्यक्त केले.आभार कुबलसरांनी मानले.

No comments:

Post a Comment

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...