Sunday, September 1, 2024

🛑 गणेशभक्तांसाठी सलून दुकाने ' सोमवारी ' सुरु ठेवणेबाबत विनंती सुचना

 🛑 गणेशभक्तांसाठी सलून दुकाने ' सोमवारी ' सुरु ठेवणेबाबत विनंती सुचना

🙏🏻 नमस्कार नाभिक सलून धारक बंधुनो..... 

दरवर्षी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपले अनेक गणेश भक्त चतुर्थीसाठी विसर्जनापर्यंत येत असतात. आपल्या या गणेश भक्तांची ' केशकर्तन ' सेवा देणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. गेले दोन दिवस आपली दुकाने पुण्यतिथी उत्सव आणि सेमिनार या कारणांमुळे बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे आपल्या ग्राहकांची गैरसोय झालेली असू शकते. आपल्या ग्राहकांची सोय करणे हे आपले पहिले उद्दिष्ट असले पाहिजे. त्यामुळे प्रतिवर्षीप्रमाणे कणकवली तालुका नाभिक संघटना व तालुका सलून असोसिएशन यांनी गणेश चतुर्थी करिता ' सोमवारी ' सलून दुकाने उघडी ठेवण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. दुकाने उघडी ठेवण्यासाठी स्वेच्छेने दुकाने उघडावीत असा ठराव मागील वर्षाच्या इतिवृत्तानुसार पुनःश्च जसाच्या तसा मंजूर करुन सर्व सलून धारकांना दुकाने सोमवारी उघडण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. याबाबत कोणतीही शंका असण्याचे अजिबात कारण नाही. तरीही कोणाची समस्या असल्यास तालुकाध्यक्ष मा. रोशन चव्हाण यांना फोन करावा ही विनंती. 

सर्वांना श्री गणेश चतुर्थी सणानिमित्त खूप खूप शुभेच्छा. 🙏🏻🙏🏻🙏🏻 गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻🙏🏻

▪️तालुकाध्यक्ष : रोशन चव्हाण

▪️युवा तालुकाध्यक्ष : रुपेश चव्हाण 

▪️तालुका सरचिटणीस : प्रवीण कुबलसर

 ©️ कणकवली तालुका नाभिक संघटना

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...