Saturday, October 5, 2024

5 ऑक्टोबर ची नाभिक सहविचार सभा उत्साहात

🛑 कणकवली तालुका नाभिक संघटनेची सहविचार सभा संपन्न

🔸 जिल्हा ब्युटी पार्लर सेमिनारमधील सहभागी सलून कारागिरांचे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव 

 कणकवली:  5 ऑक्टोबर 2024   

          कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी संघटनेच्या कार्यकारिणीचे बहुसंख्य पुरुष व महिला सदस्य उपस्थित होते. 

          सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. संत सेना महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेचे उद्घाटन करण्यात आले. नवरात्रोत्सव सुरू असल्यामुळे ' सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ' या महालक्ष्मी मातेच्या स्तवनाने सुरुवात करण्यात आली. सर्व मान्यवरांचे तालुका सरचिटणीस प्रवीण कुबल सर यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. 

          30 ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशीचा जमाखर्चाचा अहवाल परिपूर्णपणे वाचन करून दाखवण्यात आला. सर्वांनी हिशेबास सर्वानुमते मंजुरी दिली. कोणतीही रक्कम रोख हातात न ठेवता ती बँकेमध्ये भरणा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. एकूण 204 सदस्यांची विक्रमी नोंद झाल्याबद्दल तालुका संघटनेच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. 

          जिल्हा ब्युटीपार्लर सेमिनारला उपस्थित राहिलेल्या नाभिक कारागीरांना हेअर एक्सपर्ट प्रणय चव्हाण ( कणकवली तालुका प्रसिद्धी प्रमुख ) यांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक ' Certificate ' चे वितरण करण्यात आले. 

          ज्या कणकवली तालुका नाभिक सदस्यांनी अजूनही सभासद फी किंवा वर्गणी दिली नसेल तर त्यांनीही या पुढील सभेपर्यंत देण्यासाठी विनंती करण्यात आली. 

          कणकवली तालुक्यातील सर्व गावांमध्ये प्रत्येक गावात एखादा नाभिक बलुतेदार म्हणून ' गावकार ' असतो. त्याला गावचा नाभिक असेही संबोधण्यात येते. काही वेळा प्रत्येक वाढीसाठी एकाच घरातील विविध सदस्य काम पाहत असतात. कणकवली तालुक्याच्या माहितीसाठी म्हणून या सर्वांची यादी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. म्हणूनच कणकवली तालुका सरचिटणीस यांनी अध्यक्षांच्या वतीने सर्व विभागीय अध्यक्षांना सूचना मांडली. प्रत्येक विभागीय अध्यक्ष यांनी आपापल्या विभागातील सर्व गावांमधील असे ' नाभिक गावकार ' शोधून काढून त्यांची यादी बनवावी. 

          त्यानंतर प्रत्येक गावामध्ये नाभिक गावकार म्हणून काम करत असताना विविध धार्मिक विधी पार पाडावे लागतात. जसे की मुंज  जायवळ, उपनयन, मौजीबंधन, लग्नविधीतील रेग ( अशी शुभ कार्य करावी लागतात. ) तसेच शौरकर्म , शेंडी काढणे  अशा विधी करण्यासाठी नाभिक बांधवांची गरज असते. अशा सर्व प्रकारच्या धार्मिक विधीसाठी नाभिकांना सन्मानाने बोलवण्यात आले पाहिजे असा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. ज्या ठिकाणी आपल्याला सन्मान मिळत नाही असे वाटेल त्यावेळी आपण जरूर तिथे सन्मान मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवा. नाहीतर हळूहळू आपला सन्मान काढून घेण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. फक्त ' गरजेपुरता नाभिक ' असा वापर आपला होऊ नये याची प्रत्येक नाभिक बांधवांनी काळजी घेणे गरजेचे आहे. 

          प्रत्येक धार्मिक विधी कशा पद्धतीने केले जातात याबद्दल माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत चव्हाण यांनी सविस्तर माहिती सांगितली. त्यावेळी कणकवली युवा तालुकाध्यक्ष रुपेश चव्हाण यांनीही आपण कोणत्या प्रकारे धार्मिक विधी पूर्ण करतो त्याबद्दलही कृतीयुक्त कथन केले. कणकवली शहराध्यक्ष अनिल शिंदे यांनीही अधिक माहिती दिली. माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकरसाहेब यांनी विविध मुद्द्यांवर व दरपत्रक यावर चर्चा करण्यासाठी सदस्यांना उद्युक्त केले. 

          तालुका सरचिटणीस प्रवीण कुबलसर यांनी सर्वांचे आभार मानले. चहापानानंतर सहविचार सभा संपली. 












































































🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...