Wednesday, January 22, 2020

आज आपल्या लाडक्या जिल्हाध्यक्षांचा वाढदिवस

          आपले सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक मंडळाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष सन्माननीय अनिलजी अणावकरसाहेब यांचा वाढदिवस म्हणजेच प्रकट दिन आहे. त्यांना आजच्या दिवशी वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा . त्यांना त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे , समृद्धीचे , भरभराटीचे , आरोग्यसंपन्न व संघटनेला अधिकाधिक उंचीवर नेवून ठेवणारे जावो. त्यांनी आपल्या नाभिक संघटनेसाठी केलेले कार्य अनमोल असेच आहे. आर्थिक भुर्दंड सहन करत संघटनेला आज एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे  महत्कार्य त्यांनी केलेले दिसून येते. आपल्या सोबत अनेक नाभिक बांधवांना सामावून घेत त्यांना आदरपूर्वक वागणूक देणारी त्यांची कामाची पद्धत  वाखाणण्यासारखी आहे. नाभिक समाजासाठी ते झटून काम करताना दिसतात. नाभिक बांधवांनी नेहमी पुढे पुढे जात राहायला पाहिजे अशी त्यांची भावना नेहमीच राहिलेली आहे. पदरमोड करून संघटनेसाठी केलेले सहकार्य मोलाचे असेच आहे. आपल्याला मोठे म्हणावे यासाठी ते काम करत नाहीत तर संघटनेतील तळागाळातील कार्यकर्ता पुढे यावा यासाठी त्यांची कायमच इच्छा राहिलेली दिसून येते. जिल्हाचे काम करणे सोपी गोष्ट नाही. पण जीवाची व आपल्या धंद्याचीही पर्वा न करता ते जिल्हाभर आपल्या नाभिक बांधवांसाठी धावून जातात. त्यांच्या इतक्या ओळखी आहेत कि जिल्ह्यात त्यांना अनिल हेअर ड्रेसर्स या नावाने ओळखले जाते. त्यांच्या वडिलांनंतर ते जे त्यांच्या कामाचा वारसा पुढे चालवत आहेत त्यासाठी त्यांना आम्हा जिल्हा नाभिक बांधवांकडून मानाचा मुजरा आहे. त्यांनी आपले हे नाभिक कार्य असेच पुढे सुरु ठेवावे. त्यांना भालचंद्र महाराजांच्या कृपेने , भराडी देवीच्या आशीर्वादाने कधीही काहीही कमी पडू नये यासाठी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. HAPPY BIRTHDAY ANAVKARSAHEB . Wish You Many Many Happy  Returns of the day .





Tuesday, January 7, 2020

कणकवलीत होणार नाभिकांचा भव्य वधू - वर मेळावा : निमंत्रण आग्रहाचे

                                              ।।    श्री संत सेना महाराज प्रसन्न   ।।
                                           O समाज संघटना हेच समाजाचे हित O
                 
                             सस्नेह निमंत्रण : जिल्हा नाभिक वधू - वर परिचय मेळाव्याचे                                                 प्रति, 
                मा. सर्व सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक बंधू - भगिनी यांसी ,
                                                                                      सप्रेम नमस्कार विनंती विशेष .
          महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ , जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने आपणास कळविण्यास अतिशय आनंद होतो कि, आपल्या नाभिक समाजातील वधू - वरांसाठी ' वधू - वर परिचय मेळावा ' सोमवार दिनांक १० फेब्रुवारी २०२० रोजी आयोजन करीत आहोत. हा भव्य मेळावा महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष मा. श्री. कल्याणजी दळेसाहेब व त्यांची टीम , राज्य उपाध्यक्ष मा. श्री. विजयजी सि. चव्हाणसाहेब ,  सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष मा. अनिल यशवंत अणावकरसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. त्यावेळी माजी सर्व जिल्हाध्यक्ष , कमिटी सदस्य , ज्येष्ठ नागरिक ,  सर्व तालुक्यांचे अध्यक्ष , सर्व तालुक्यांचे सचिव , महिला अध्यक्षा , तालुका सदस्य , विद्यमान जिल्हा कमिटी सदस्य , युवक- युवती , वधू - वर यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
           तरी आपल्या नाभिक समाजातील सर्व वधू वरांनी आपला नाव नोंदणी अर्ज विहित नमुन्यामध्ये आपापल्या तालुका अध्यक्षांकडे भरून जमा करावा. सदर भव्य सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सुयोग्य असे वधू- वर निवडून आपल्या आयुष्याला नव्या उमेदीने सुरुवात करावी. या मेळाव्यास सर्व ज्ञाती बांधवांची , सभासद यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे, अशी नम्र विनंती सिंधुदुर्ग नाभिक संघटनेने केली आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा :

  • सकाळी ९ ते १०.३० - चहा , नाश्ता 
  • १०.२० वाजता - मान्यवरांचे स्वागत 
  • ११.०० वाजता - दिपप्रज्वलन 
  • मान्यवरांचे सत्कार व मार्गदर्शन 
  • वधू - वर परिचय - १२. ०० वाजता 
  • दुपारचे भोजन - १.०० ते ३.००
  • समारोप - ३. ३० वाजता .
स्थळ : चौंडेश्वरी मंगल कार्यालय ,कणकवली 
दिनांक : सोमवार दि. १० फेब्रुवारी २०२० 
वेळ : १० ते ४ पर्यंत .
                                                                     आपले नम्र , 
स्फूर्ती व प्रेरणास्थान : कै. यशवंत हरी अणावकरगुरुजी , कै. विवेकानंद लाड उर्फ स्वामी लाड , कै . चंद्रकांत सदानंद चव्हाण ( चंदू ) यांच्या पवित्रस्मृतींना विनम्र अभिवादन .

जिल्हा कमिटी : 
  • सुधीर चव्हाण , जगदीश वालावलकर , चंद्रशेखर चव्हाण , किशोर पिंगुळकर , किशोर लाड , श्री. रेडकर 
  • संदेश चव्हाण, राजन पवार , श्रीकृष्ण गिरकर, भाई आकेरकर , सुभाष चव्हाण , चंद्रकांत भि . चव्हाण 
  • विठोबा चव्हाण , अनिल चव्हाण , रुपेश पिंगुळकर , प्रसाद तुळसकर , उमेश चव्हाण , जयराम परमेकर 
तालुका अध्यक्ष :
  • आनंद आचरेकर ( मालवण ) , रविंद्र महाले ( दोडामार्ग ) , किरण पवार ( वेंगुर्ला ) ,
  • वैभव चव्हाण ( सावंतवाडी ) ,  नितेश पिंगुळकर ( कुडाळ ) , लक्ष्मीकांत चव्हाण ( कणकवली ) , 
  • बंड्या सावंत  ( वैभववाडी ) , तुळशीदास चव्हाण ( देवगड ) , संजना संदिप चव्हाण ( सावंतवाडी ) , 
  • संजना संजय चव्हाण ( कणकवली ) , विद्या चव्हाण ( कुडाळ ) , माधवी चव्हाण ( देवगड ), प्रतिभा चव्हाण ( मालवण ) 
  • सर्व तालुका सचिव , सहसचिव , खजिनदार व पदाधिकारी , महिला भगिनी , तमाम शासकीय / निमशासकीय नाभिक अधिकारी व कर्मचारी वर्ग 


🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...