प्रति,
मा. अरुण शंकर शिंदे ,
जिवा सेना संघटक,
कोकण विभाग , रत्नागिरी जिल्हा ,
महाराष्ट्र पंचायत परिषद .
यांसी,
स. न. वि. वि.
विषय : कणकवली तालुका शाखेतील नाभिक समाजातील गरीब होतकरू मुलींना आर्थिक सहाय्य
मिळणेबाबत.
महाशय,
आमच्या कणकवली तालुका नाभिक मंडळाकडून आपणाकडे दोन गरीब व होतकरू नाभिक शाळकरी मुलींना पुढील शिक्षण घेण्यासाठी आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करीत आहोत. सोबत त्यांनी दिलेली कागदपत्रे त्यांच्या फोटोसह पाठवित आहोत. तरी कृपया सदर अर्जांचा सहानुभूतीने विचार करून आमच्या कणकवली नाभिक परिवारातील मुलींना आर्थिक साहाय्य मिळवून देण्यास या अर्जान्वये आपणास कळकळीची विनंती आहे.
१ ) कु. दिप्ती सुनील चव्हाण ही शाळकरी मुलगी उच्च माध्यमिक शिक्षण घेत असून ती तरेळे ( वाघाची वाडी ) ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग पिन- ४१६८०१ येथील रहिवासी आहे. तिची जन्मतारीख २१ / ०३ / २००१ अशी असून तिचा आधार नंबर - ६८६९१२८९६३५७ असा आहे . तरी तिला पुढील शिक्षण घेणेसाठी आपल्या जिवा सेना संघटनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळण्यास विनंती आहे.
२ ) कु.लतिका नागेश चव्हाण ही शाळकरी मुलगी माध्यमिक शिक्षण घेत असून ती फोंडा ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग या गावची रहिवासी आहे. तिची जन्मतारीख ०२ / ०१ / २००४ अशी असून तिचा आधार नंबर ५५०९३२२९५८५२ असा आहे. तरी तिला पुढील शिक्षणासाठी आपल्या जिवा सेना संघटनेकडून आर्थिक मदतीचा लाभ झाल्यास तिला पुढील घेण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन मिळेल, म्हणून तिलाही जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी ही नम्र विनंती.
तरळे विभागीय अध्यक्ष श्री. समीर चव्हाण व फोंडा विभागीय अध्यक्ष श्री. सुनील चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार व आपण केलेल्या आवाहनानुसार आपणाकडे सदर मुलींची माहिती फोटोसह व त्यांच्या कागदपत्रांसह पाठवत आहोत तरी लवकरात लवकर या दोन्ही मुलींना मदत मिळाल्यास त्यांच्या पुढील उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने साहाय्यभूत ठरू शकेल.
कळावे, महाशयांस विदित व्हावे. दिनांक : ०९ / १२ / २००८
सोबत : १ ) कु. दिप्ती सुनील चव्हाण हिचा फोटो व तिच्या आधारकार्डची सत्यप्रत
२ ) कु. लतिका नागेश चव्हाण हिचा फोटो , बोनाफाईड दाखला , रहिवासी दाखला
अध्यक्ष, कणकवली तालुका नाभिक मंडळ,
नोंदणी क्रमांक : महाराष्ट्र राज्य , मुंबई एफ १५६४९