Saturday, November 4, 2023

🛑 नाभिक बांधवांनो , आपले आरोग्य सांभाळा : शहराध्यक्ष अनिल शिंदे

 🛑 नाभिक बांधवांनो , आपले आरोग्य सांभाळा : शहराध्यक्ष अनिल शिंदे 

कणकवली : 

          अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी कणकवली नाभिक संघटनेची शहर सभा नुकतीच अतिशय नियोजनबद्ध संपन्न झाली. 

          त्यावेळी सर्व पदाधिकारी आणि सर्वसाधारण सदस्य , सदस्या यांचे शाब्दिक स्वागत करण्यात आले. संघटनेच्या उपक्रमांच्या निमित्ताने नाभिक बांधव एकत्र येत असतात , त्यामुळे एकमेकांना भेटून आपल्यातील जिव्हाळा वाढत असतो. शहर सभेच्या निमित्ताने एकत्र येत नाभिक बंधु भगिनींनी आपले विविध व्यावसायिक , सामाजिक अनुभव एकमेकांना सांगून मोकळे व्हायला होण्याची सभा हे एकमेव व्यासपीठ आहे. आपल्या समस्या सांगितल्याने त्यांची तीव्रता कमी होत जाते ही महत्त्वाची गोष्ट आहे. 

          तालुका सरचिटणीस प्रवीण कुबल यांनी प्रास्ताविक केले. नुकतेच दुःखद निधन झालेल्या माजी शहराध्यक्ष कै. सुर्यकांत चव्हाण यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. नाभिक नेते अनिल अणावकर , जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण , तालुकाध्यक्ष रोशन चव्हाण , उपाध्यक्ष निलेश चव्हाण , ज्येष्ठ सल्लागार सुभाष चव्हाण , शहराध्यक्ष अनिल शिंदे यांनी कै. सुर्यकांत चव्हाण यांच्याबद्दल शोकपर मनोगत व्यक्त केले. त्यांच्यासोबतच्या आठवणी सांगितल्या. कै. सुर्यकांत चव्हाण यांनी केलेल्या संघटनात्मक कार्याचा पुनरुच्चार केला व त्यांच्या जाण्याने एक सच्चा नाभिक कार्यकर्ता हरपल्याबद्दल दुःख व्यक्त केले. 

          नवीन सलून दुकान सुरु केलेल्या कनेडी माजी विभागीय अध्यक्ष नंदकिशोर चव्हाण यांच्यासाठी अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. 

          नाभिक महिलांसाठी व पुरुषांसाठी विविध सेमिनार राबविण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यात सर्वांनी सहभाग घेतला. सकारात्मक चर्चा करण्यात आली. तालुका महिला सल्लागार भक्ती चव्हाण यांनी महिलांचे प्रशिक्षण घेण्यासाठी सहकार्य देण्याचे मान्य केले. लवकरच यांवर नियोजन करुन वेळापत्रक तयार करण्यात येईल. 

          नाभिक पुरुष हेअर एक्सपर्ट यांचे सहाय्य घेऊन सलून व्यवसायातील नवीन पद्धती समजून घेण्यासाठी आगळा वेगळा विशेष सेमिनार घेण्यात येईल. त्यासाठी तालुका प्रसिद्धी प्रमुख व हेअर एक्सपर्ट प्रणय चव्हाण यांचे विशेष सहकार्य घेण्यात येणार आहे. 

          कणकवली तालुक्यातील शहर महिला नाभिक भगिनींचे त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांबद्दल विशेष कौतुक करण्यात आले व अभिनंदन करण्यात आले. 

           नाभिक नेते अनिल अणावकर , जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण , तालुकाध्यक्ष रोशन चव्हाण यांनी सर्व बांधवांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व नाभिक बंधु भगिनींनी अतिशय चांगले विचार मांडून सभा यशस्वी केली. सभा सलग तीन तास चालली.

          त्यावेळी तालुका कार्याध्यक्ष संजय कुबल , तालुकाध्यक्षा तेजस्विनी कुबल , कार्याध्यक्षा प्रिया चव्हाण , कोषाध्यक्षा अभिलाषा शिंदे , जिल्हा सदस्या साक्षी चव्हाण , रचना चव्हाण , प्रवीण चव्हाण , गुरुदास चव्हाण , शिवानी चव्हाण , सचिव आरती चव्हाण , कनेडी अध्यक्षा चंदा चव्हाण , कणकवली शहर युवा अध्यक्ष संजय चव्हाण ( कसालकर ) , सहसचिव ईश्वरी कुबल , सहखजिनदार राजेश चव्हाण , महिला युवा अध्यक्षा पूनम चव्हाण , ज्येष्ठ सदस्या नंदा चव्हाण , ज्येष्ठ सदस्य अरुण चव्हाण , अस्मिता अणावकर , प्रतिक्षा चव्हाण बहुसंख्य नाभिक बांधव उपस्थित होते. 

          महिला कार्याध्यक्षा प्रिया चव्हाण यांना गांगोमंदिर मित्रमंडळ यांच्यावतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत पैठणी प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. तसेच तालुका उपाध्यक्ष निलेश चव्हाण यांची कणकवली शाळा नं.३ च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.


























🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...