Thursday, March 10, 2022

🛑 हिरकणी पुरस्कार माझ्यासाठी अभिमानास्पद : हेमांगी अणावकर

🛑 कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या महिला आघाडीचा मेळावा उत्साहात संपन्न

कणकवली : 

          जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कणकवली नाभिक संघटनेच्या वतीने नाभिक महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी महिला सचिव हेमांगी अणावकर यांना यावर्षीचा हिरकणी पुरस्कार देण्यात आला. सन्मानपत्र , सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला. 

          हेमांगी अनिल अणावकर म्हणाल्या , " मला हिरकणी पुरस्कार मिळणे हे अनपेक्षित होते. संघटनेने माझा जो गौरव केला त्याबद्दल मी संघटनेच्या कायम ऋणात राहीन." त्यावेळी संपदा मंगेश चव्हाण यांनाही  पुरस्कार देण्यात आला. 

          कणकवली नाभिक महिला तालुकाध्यक्षा तेजस्विनी कुबल यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण ,  तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत चव्हाण , उपाध्यक्षा रसिका आचरेकर , कार्याध्यक्षा प्रिया दशरथ चव्हाण , तालुका सल्लागार भक्ती चव्हाण , जिल्हा सदस्या रचना चव्हाण , नाभिक नेते दिगंबर चव्हाण , जिल्हा सल्लागार सुभाष चव्हाण , जिल्हा सदस्य रुपेश पिंगुळकर , माजी जिल्हा उपाध्यक्ष अशितोष कुबल , कोषाध्यक्षा अभिलाषा शिंदे , कनेडी विभागीय अध्यक्ष नंदकिशोर चव्हाण , नाभिक कॅरम कन्या दिक्षा चव्हाण , फोंडा विभागीय अध्यक्ष सुनिल चव्हाण , वरवडे ग्रामपंचायत सदस्या सारिका लाड , जय भवानी ग्रुपचे कार्यवाह रोशन चव्हाण इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते. 

          मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व सेना महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. महिला मंडळाने ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. विविध आदरयुक्त व्यक्तींच्या वेशभूषा साकारल्या. त्यात ईश्वरी कुबल , रचना चव्हाण , नंदा चव्हाण , तनिष्का कुबल , पुर्वीलक्ष्मी शिंदे , प्रिती चव्हाण , आरती चव्हाण , गीता चव्हाण , संपदा चव्हाण , भक्ती चव्हाण , प्रतिक्षा चव्हाण यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. 

          त्यानंतर लहान मुली , युवती आणि महिला यांनी एकल नृत्ये सादर केली. त्यात आर्या टिपूगडे , स्वानंदी कुबल , रचना चव्हाण , तेजस्विनी कुबल , प्रदिप्ती कुबल , तनिष्का कुबल , दुर्वा चव्हाण , गौरी चव्हाण , संपदा चव्हाण , गार्गी चव्हाण , प्रतिक्षा चव्हाण , दिव्या चव्हाण यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. 

          त्यानंतर संगीत खुर्ची , बादलीतील वाटीत नाणे टाकणे , एका आगकाडीत मेणबत्त्या पेटवणे , लिंबू चमचा , सुईत दोरा ओवणे , डोक्यावर वही ठेवून चालणे इत्यादी फनिगेम्स घेण्यात आले. त्यात प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना आकर्षक प्रमाणपत्रे व भेटवस्तू देण्यात आल्या. 

          शेवटी सहा लकी ड्रॉ विजेत्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व प्रसंगानुरूप मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कणकवली तालुका नाभिक संघटनेचे सरचिटणीस प्रवीण कुबल यांनी केले.महिला आघाडीने अतिशय परिश्रम घेऊन मेळावा संपन्न केल्याबद्दल तालुक्यातील सर्व महिला त्यांचे कौतुक करत आहेत.





🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...