Wednesday, January 30, 2019

उद्या व्यापारी महासंघाचा आहे जिल्हा मेळावा

     उद्या दिनांक ३१ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा मेळावा दोडामार्ग येथे असल्याने त्यामध्ये सर्व व्यापारी जाणार असल्याने सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी बांधव जाणार आहेत. तरी आपल्या नाभिक बांधवांनी त्यामध्ये सहभागी व्हावे . गेल्यावर्षी आपणही त्यांच्या मेळाव्यात सहभागी असल्याचे दाखवून दिले होते. यंदाही आपण सर्व सामूहिकरीत्या दुकाने बंद ठेऊन त्यांच्यासोबत राहावे ही विनंती.
     कणकवलीसह जिल्ह्यातील सर्व सलूनधारकांनी आपली दुकाने बंद ठेवून संघटनेला सहकार्य करावे ही विनंती.

नाभिक वारी केली पूर्ण

     दिनांक २८ जानेवारी रोजी कणकवली शहर नाभिक संघटनेच्या मोजक्या सदस्यांनी सोमवारी भराडी देवीला शरण जाऊन आपल्यावर येणाऱ्या संकटांचे निराकरण करण्यासाठी गाऱ्हाणे घातले.

Saturday, January 26, 2019

उद्याच्या कणकवली ते आंगणेवाडी नाभिक वारीत मोठ्या संख्येने उपस्थित राहा.

     नाभिक जनतेवर नेहमी वरदहस्त ठेवणारी भराडी माता , सर्वांची मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी कणकवली नाभिक बांधव पायी वारी नेतात. यावर्षी दोन वेळा नाभिक वारी ठरवून ती साध्य करता आलेली नाही. विविध अडचणी आल्याने ती पूर्ण न करता आल्याची खंत कायम बोचत राहू नये, म्हणून उद्या आपली नाभिक वारी आपण पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. ज्यांना त्यामध्ये सामील व्हायचे आहे, त्यांनी उत्स्फूर्त सहभाग द्यायचा आहे. आपल्या नाभिक बांधवांचा उपक्रम पूर्ण करणे हेच उद्दिष्ट नसून अखिल नाभिक मानवजातीच्या कल्याणासाठी आपण नाभिक वारी संपन्न करत आहोत. देवीला साकडे घालून देवीसमोर नतमस्तक होत तिला मनोमन शरण यायचे आहे. आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्यांचे क्षालन होण्यासाठी आपण सामुहिकरित्या तिला गाऱ्हाणे घालणार आहोत.
     जाताना आपण पायी जाणार नसून आपापल्या वाहनाने जाणार आहोत. ज्यांना वाहनाची सोय होत नसेल त्यांनी ठिक सकाळी ९ वाजता श्री. अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी उपस्थित राहायचे आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत ११ वाजता तिथे पोहोचायचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येणारे इतर तालुक्यांमधील नाभिक देखील त्यांच्या श्रद्धेप्रमाणे तिथे येतील अशी आपण आशा करूया. निर्मळ भक्तीने येणाऱ्या सर्वांचे आपल्या वारीमध्ये स्वागतच असेल. संख्या जास्त झाल्यास आपणास योग्य गाड्यांची व्यवस्था करता येऊ शकते.
     ज्यांना  ठामपणे यायचे असेल त्यांनी कृपया कणकवली नाभिक whats app group वर आपले नाव लिहून कळवावे. म्हणजे आम्हाला संख्या समजेल. त्यानुसार traveller ठरवता येईल. कळावे. यात काही बदल असेल तरच कळवण्यात येईल, नाहीतर हाच संदेश समजून आपण आपल्या नाभिक भक्ती वारीत आपल्या बंधू भगिनीसह सामील होण्यास आग्रहाची विनंती आहे. काही शंका असल्यास कुबलसरांना फोन करा. धन्यवाद.

भालचंद्र महाराजांच्या जयंतीनिमित्त झालेल्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले कणकवली नाभिक व त्यांनी राबवलेले स्वच्छता अभियान





































Monday, January 21, 2019

आज आमच्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस - २३ जानेवारी
















































































          आज आम्हा नाभिक बांधवांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. कारण या दिवशी आमच्या लाडक्या नाभिक नेत्याचा जन्म झाला.

  • अ - अत्यंत प्रेमाने नाभिक बांधवांशी जवळीक साधणारे 
  • नि - निरपेक्ष अंतकरणाने सर्वांशी संवाद करणारे 
  • ल - लक्ष संघटनेच्या हिताचेच नेहमी बाळगणारे 
  • य - यक्षप्रश्नांची उत्तरे आपल्या बुद्धीने सोडवणारे 
  • श - शहरापासून खेड्यांपर्यंत सर्वांशी नातेसंबंधांनी बांधलेले 
  • वं - वंदन करत सर्वांचा अतिशय आदर करणारे 
  • त - तरुण तडफदार व आदर्श व्यक्तिमत्त्व असणारे 
  • अ - अनपेक्षितपणे निर्णय सांगून सर्वांचे मन जिंकणारे 
  • ना - ना कधी भांडणारे , ना कधी अनादर करणारे 
  • व - वरून कठोर पण आतून फणसाच्या गऱ्याप्रमाणे
  • क - कसलाही आर्थिक विचार न करता निस्वार्थी समाजसेवा करणारे 
  • र - रक्षण करतील ते समस्त नाभिक बांधवांचे असा ठाम विश्वास असणारे .

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...