🛑 नाभिकांचे संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी
🔸 कणकवली तालुका नाभिक संघटनेने केली विविध उपक्रमांनी साजरी
कणकवली दिनांक 30 ऑगस्ट 2024 :
कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने यंदा सुद्धा संत सेना महाराजांची पुण्यतिथी अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरी करण्यात आली. सकाळी ठीक नऊ वाजता अनिल आढावकर यांच्या निवासस्थानी संत सेना महाराजांच्या मूर्तीचे होंडा विभागीय माजी अध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले. प्रकाश चव्हाण, तातोबा चव्हाण आणि विजय चव्हाण यांच्या वाद्य वृंदांनी अतिशय मंत्रमुग्धपणे भजन सेवा दिली. त्यात कणकवली नाभिक संघटनेचे गोड गळ्याचे कोरस उत्स्फूर्त सहभागी झाले होते. कणकवली शहराध्यक्ष अनिल शिंदे यांनी छान अभंग म्हटले. त्यानंतर सामूहिक आरती करण्यात आली. कैलासवासी एटी कुबल यांनी रचलेली संत सेना महाराजांची ' आरती स्वामी संता ' ही आरती म्हणण्यात आली. जिल्हा सल्लागार सुभाष चव्हाण यांनी मालवणी पद्धतीमध्ये अत्यंत भावनापूर्ण गाऱ्हाणे सादर केले. त्यानंतर अल्पोपहार आणि चहाचा कार्यक्रम सुरू झाला.
बाल गोपाळ हनुमान मंदिर कणकवली येथे नाभिक महिलांनी काढलेल्या रांगोळीचं प्रदर्शन मानण्यात आले. या प्रदर्शनामध्ये एकूण सात महिलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक तुळशीदास कुबल यांनी केले.
कणकवली नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष समीरजी नलावडे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष अनिलजी अणावकर, विद्यमान कार्याध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण, कणकवली तालुकाध्यक्ष रोशन चव्हाण, कार्याध्यक्ष संजय कुबल, उपाध्यक्ष निलेश चव्हाण, कणकवली तालुका युवा अध्यक्ष रुपेश चव्हाण, कणकवली तालुका महिला अध्यक्षा तेजस्विनी कुबल, कार्याध्यक्षा प्रिया चव्हाण, महिला सचिव आरती चव्हाण, जिल्हा सदस्या साक्षी चव्हाण, रचना चव्हाण, तालुका महिला सल्लागार भक्ती चव्हाण, माजी महिला अध्यक्षा संजना चव्हाण, खजिनदार मनोज चव्हाण, सहखजिनदार राजेश चव्हाण, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिगंबर चव्हाण, माजी सचिव विलास चव्हाण, जिल्हा सदस्य प्रवीण चव्हाण, गुरु चव्हाण, रामदास चव्हाण, खारेपाटण विभागीय अध्यक्ष मनोहर चव्हाण, कनेडी विभागीय अध्यक्ष प्रशांत चव्हाण, कणकवली तालुका प्रसिद्धीप्रमुख प्रणय चव्हाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गणेश चव्हाण, विठोबा चव्हाण, समीर चव्हाण, नंदू चव्हाण आणि 200 पेक्षा जास्त नाभिक बांधव उपस्थित होते.
कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले, " कणकवली तालुका नाभिक संघटना एक अतिशय चांगली संघटना आहे. गेली कित्येक वर्षे मी या संघटनेच्या विविध उपक्रमांमध्ये प्रमुख अतिथीच्या रूपाने येत असतो. संघटनेची माणसे खूप प्रेमाने मला बोलावतात. संघटनेमधील माणसांची एकी पाहून मी भारावून गेलो आहे. कणकवली नगरपंचायतीच्या वतीने नाभिक संघटनेसाठी काही काम करता आले तर मी नक्की आपल्यासाठी करणार आहे "
कैलासवासी श्रीधरराव नाईक यांच्या स्मरणार्थ संकेत श्रीधर नाईक यांजकडून विविध स्पर्धांसाठी 15 सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. संत सेना महाराज चित्र स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संकेत नाईक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करण्यात आला. बालगटामध्ये प्रथम क्रमांक ओमकार प्रवीण चव्हाण, द्वितीय क्रमांक तन्मय अमिताभ चव्हाण, तृतीय क्रमांक स्वानंदी प्रवीण कुबल, किशोर गटामध्ये प्रथम क्रमांक मयुरेश तुळशीदास कुबल, द्वितीय क्रमांक स्वरा प्रताप चव्हाण, तृतीय क्रमांक आयुष रमेश आचरेकर, खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांक प्रदिप्ती तुळशीदास कुबल, द्वितीय क्रमांक ऋतुजा रोशन चव्हाण, तृतीय क्रमांक भालचंद्र दशरथ चव्हाण यांना सन्मानपत्रे, ट्रॉफी व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.
रांगोळी स्पर्धेमध्ये महिला गटामध्ये प्रथम क्रमांक प्राची कृष्णा चव्हाण, द्वितीय क्रमांक साक्षी प्रकाश चव्हाण आणि तृतीय क्रमांक अभिलाषा अनिल शिंदे यांना देखील सन्मानपत्र ट्रॉफी आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
यावर्षी एक वेगळ्या प्रकारची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली होती. शून्य ते सहा वर्षे वयोगटाच्या मुलांना संत सेना महाराजांच्या वेशभूषेमध्ये येण्याची संधी देण्यात आली होती. सहभागी सर्व मुलांनी अतिशय सुंदर सादरीकरण केले. त्यामध्ये प्रथम क्रमांक अवनी गुरुनाथ चव्हाण, द्वितीय क्रमांक अन्वी अजित चव्हाण आणि तृतीय क्रमांक विघ्नेश प्रवीण चव्हाण ट्रॉफी सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. राघव रोशन चव्हाण यालाही उत्तेजनार्थ सन्मानपत्र देण्यात आले.
कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने देणगीदार संकेत श्रीधर नाईक यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना संकेत नाईक म्हणाले, " कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या सत्कार समारंभाला उपस्थित राहताना खूप आनंद होतो आहे. बालगटातील या मुलांचा सन्मान करताना आपले बालपण आठवते आहे. कणकवली तालुका नाभिक संघटनेने मला ही सेवेची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. "
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख गणेश चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. गणेश चव्हाण म्हणाले , " कणकवली तालुका नाभिक संघटनेचे उपक्रम नेहमीच स्तुत्य असतात. पदाधिकाऱ्यांनी राबवलेले उपक्रम अतिशय उल्लेखनीय आहेत. नाभिक समाजातील सर्व युवा पिढीने पुढे येण्यासाठी या उपक्रमांचा नक्कीच फायदा होणार आहे. आजच्या पिढीने आपल्या सलून-धंद्याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर आपल्या वतीने एक जिल्हा सेमिनार आयोजित करण्यात येत आहे. या सेमिनारला उपस्थित राहून नवीन युवा पिढीने आपले भविष्य घडविण्यासाठी एक प्रगतीचे पुढचे पाऊल टाकावे अशी मी आपणास नम्र विनंती करीत आहे. "
कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या या उपक्रमामध्ये राज्यातील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रसाद चव्हाण देखील प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी ब्युटी पार्लर बद्दल व सलून असोसिएशन बद्दल अधिक माहिती दिली. त्यांच्या शुभहस्ते सर्व उत्तीर्ण मुलांचे मुलींचे सत्कार समारंभ संपन्न करण्यात आले.
कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने दरवर्षी आदर्श नाभिक बांधव पुरस्काराने विविध विभागातील नाभिक बांधवांना सन्मानित करण्यात येते. यावर्षी कणकवली विभागातून राजेश शिवराम चव्हाण, तळेरे विभागातून मनोज लवू साळुंखे, खारेपाटण विभागातून मनोहर अनंत चव्हाण, नांदगाव विभागातून शैलेश रमेश टाकळे, फोंडा विभागातून प्रकाश सुदाम साळुंखे, कनेडी विभागातून नंदकिशोर हरिश्चंद्र चव्हाण आणि ओसरगाव विभागातून नवनीत चव्हाण यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.
यावर्षी अन्नपूर्णा निधी योजनेतील एकूण 17 देणगीदारांचे देखील सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. त्यामध्ये संतोष चव्हाण, ईश्वरी कुबल, सुनील चव्हाण, अनंत चव्हाण, संतोष चव्हाण, संतोष टिपुगडे, निलेश चव्हाण, अशोक चव्हाण, तेजस्विनी कुबल, प्रार्थना चव्हाण, प्रिया चव्हाण, रचना चव्हाण, नारायण कुबल, आनंद चव्हाण, अनिल अणावकर आणि कणकवली तालुका महिला आघाडीचा सन्मान करण्यात आला.
या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये गेल्या वर्षभरात दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या नाभिक समाजातील एकूण 30 मुला-मुलींचा भेटवस्तू गुलाबपुष्प आणि सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.
तालुका सरचिटणीस प्रवीण कुबल सर यांनी सर्वांचे आभार मानले. माजी जिल्हा उपाध्यक्ष विठोबा चव्हाण यांनी कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या विविध उपक्रमाबद्दल गौरव उद्गार काढले. कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने प्रवीण कुबल सर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 30 जणांना लकी ड्रॉ द्वारे विविध भेट वस्तूंचे वितरण करण्यात आले. त्यानंतर 250 पेक्षा जास्त नाभिक बंधू-भगिनींनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
©️ तालुका सरचिटणीस : प्रवीण कुबलसर






















































































































































































































































































































































































