Monday, December 30, 2019

कणकवली तालुका नाभिक पायी वारी उत्साहात केली पूर्ण

कणकवली : दिनांक : ३० डिसेंबर २०१९ :
          गेली तीन वर्षे महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ तालुका कणकवली शाखा कणकवली ते आंगणेवाडी पर्यंत एक दिवसीय पायी वारीचे आयोजन करते. यंदाही नाभिक वारीचे आयोजन करण्यात आले होते. वारीचे चौथे वर्ष पूर्ण करताना सहभागी झालेल्या सर्व नाभिक ज्ञातिबांधवांना झालेला आनंद गगनात मावत नव्हता.
          भालचंद्र संस्थानापासून ठिक सकाळी ६ वाजता गाऱ्हाणे सांगून वारीचे प्रयाण झाले. त्यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत चव्हाण, शहर अध्यक्ष सूर्यकांत चव्हाण , सल्लागार सुभाष चव्हाण , खजिनदार रमेश आचरेकर, जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण , दशरथ चव्हाण , कनेडी अध्यक्ष नंदकिशोर चव्हाण, पत्रकार गणेश चव्हाण, महिला मंडळ अध्यक्षा संजना चव्हाण , उपाध्यक्षा प्रिया चव्हाण, महिला मंडळ सदस्या, कणकवली शहरातील तमाम नाभिक बंधू भगिनी मिळून एकूण ६० पेक्षा जास्त बांधव उपस्थित होते.
          पायी प्रवास करताना भराडी देवी मातेचे दर्शन घेण्याची आस लागून राहिलेले सर्व नाभिक बांधव अगदी मनापासून पायी वारीमध्ये सहभागी झाल्याचे दिसून येत होते. नाभिक ध्वज पताका कणकवली ते आंगणेवाडी अनवाणी पायाने नेण्याचे महत्कार्य नामदेव न्हावी यांनी केले. चालताना ' संत सेना महाराजांचा विजय असो ' असा जयघोष करत आपल्या बांधवांना भेटत भेटत पुढे पुढे मार्गक्रमण करत वारी आंगणेवाडी मुक्कामी दाखल झाली. तिथे गेल्यानंतर सर्वांनी ' भराडी मातेला वंदन केले. आपल्या नाभिक बांधवांना सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. झेंडे, पताका घेऊन निघालेले नाभिक व्यावसायिक बांधव पायी वारीमध्ये कमालीचे रममाण झालेले दिसत होते. आपापसातले हेवेदावे विसरून एकत्र येत आणि आपल्या बांधवांच्या हिताचा विचार करत निघालेली पायी वारी पाहताना दर्शक देखील त्यात सहभागी होत नाभिक बांधवांना प्रोत्साहन देत होते.
          आप्पा चव्हाण यांनी मसाला दूध , प्रवीण कुबल यांनी अल्पोपहार , चंद्रकांत चव्हाण व रमेश आचरेकर यांनी शीतपेय , भोजन व्यवस्था चंद्रशेखर चव्हाण व दशरथ चव्हाण यांनी केली. श्रावण गावचे नाभिक बांधव व पत्रकार गणेश चव्हाण यांनी सर्व बांधवांशी हितगुज करत उत्तम संवाद साधला. त्यांनी सर्वांना आईस्क्रीम दिले. 
          नाभिक संघटनेच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम राबवला जात आहे याबाबत कणकवली तालुक्यातील नाभिक बांधवाच्या एकजुटीबद्दल इतर सामाजिक संघटनांनी कौतुक केले आहे.

Friday, December 13, 2019

डॉ. शमिता बिरमोळे यांना विनंती पत्र

प्रति,                                                                                                               दिनांक : १३ डिसेंबर २०१९
       मा. डॉ. शमिता बिरमोळे मॅडम ,
        गुरुकृपा हॉस्पिटल , कणकवली
                                                         यांसी ,
                                                                     सप्रेम नमस्कार ...विनंती विशेष ...

          विषय : महिलांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन मिळणेबाबत ....

         महोदया ,
                         कणकवली तालुका शाखा नाभिक महिला मंडळ अंतर्गत सभा शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजी भालचंद्र महाराज संस्थानच्या शेजारी अनिल अणावकर यांचे निवासस्थानी दुपारनंतर ठिक ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या पूर्वीच्या सभेत आपले मार्गदर्शन मिळणे संदर्भात आमच्या महिलांनी तुमचे नाव घेतले होते. पण आम्ही तुमच्याकडे संपर्क करू शकलो नव्हतो. मुखरेमॅडमांकडून तुमची वेळ घेणेचा प्रयत्न केला असता तुम्ही मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहात असे कळले आणि आनंद झाला. आमच्या नाभिक समाजातील महिलांना आरोग्यविषयक काय काळजी घ्यावी, मासिक धर्म, दैनंदिन जीवनशैली, नववधुंना मार्गदर्शन, किशोरीवयीन मुलींच्या मातांना मार्गदर्शन असे एक तासाचे मार्गदर्शन आपण कराल अशी आपणाकडे नम्र विनंती आहे.
                         कळावे...लोभ असावा .
                                                                                                               आपले नम्र ,
                                                                                                     प्रवीण अशितोष कुबल
                                                                                                               सचिव ,
                                                                                  महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ , मुंबई
                                                                                          शाखा : कणकवली तालुका 



         

Monday, December 9, 2019

३० डिसेंबर २०१९ : कणकवली ते आंगणेवाडी नाभिक बांधवांची पायी वारी जाणार

वारीला जाणाऱ्या नाभिकांची प्रथम यादी :

  1. अनिल अणावकर 
  2. चंद्रशेखर चव्हाण 
  3. सुभाष चव्हाण 
  4. रमेश आचरेकर 
  5. प्रवीण कुबल 
  6. चंद्रकांत चव्हाण कनेडी 
  7. नंदकिशॊर चव्हाण , कनेडी 
  8. संजय चव्हाण , कसालकर 
  9. पांडुरंग साळोखे 
  10. अरुण चव्हाण 
  11. निलेश चव्हाण 
  12. राजेश चव्हाण 
  13. महेश चव्हाण ( सातरल )
  14. संजय कुबल 
  15. रोशन चव्हाण 
  16. प्रणय चव्हाण 
  17. प्रताप चव्हाण 
  18. श्यामसुंदर चव्हाण 
  19. गुरुदास चव्हाण 
  20. मनोज वसंत चव्हाण 
  21. दशरथ चव्हाण 
  22. भालचंद्र चव्हाण 
  23. गौरव चव्हाण 
  24. महादेव शंकर चव्हाण 
  25. महेश चव्हाण आदिमाया 

Thursday, December 5, 2019



कणकवली : दिनांक १ ऑगस्ट २०१९ : प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण महिन्यात येणारी संत सेना महाराजांची पुण्यतिथी कणकवली तालुका नाभिक मंडळाच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरी केली जाणार आहे. यंदा २७ ऑगस्ट रोजी संत सेना महाराजांची पुण्यतिथी येत असल्याने त्यादिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात अधिक चर्चा करण्याच्या उद्देशाने १० ऑगस्ट रोजी कणकवली तालुका नाभिक मंडळची सहविचार सभा अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी भालचंद्र नगर येथे दुपारनंतर ठिक २ वाजता संपन्न होणार आहे. तरी सर्व कणकवली तालुक्यातील नाभिक बांधवांना नम्र विनंती करण्यात येत आहे कि, सर्व सलूनधारक, सलूनकारागीर, नाभिक कर्मचारी यांनी सभेला उपस्थित राहावे. सर्व कनेडी ,फोंडा,नांदगाव, तरेळे ,खारेपाटण विभागीय अध्यक्ष, सचिव  यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन  कणकवली तालुका नाभिक मंडळाचे सचिव प्रवीण कुबल यांनी केले आहे. 

Monday, August 19, 2019

निमंत्रणपत्रिका - २७ ऑगस्ट - संत सेना पुण्यदिन

                                     निमंत्रण आग्रहाचे - सेना महाराज पुण्यतिथीचे 

           कळवण्यास अत्यंत आनंद होतो कि, दिनांक २७ ऑगस्ट १९ रोजी मंगळवारी नाभिक संत सेना  महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा ' भव्य नाभिक मेळावा ' स्वरूपात संपन्न होणार आहे. तरी कणकवली तालुक्यातील आपण सर्व नाभिक बांधवांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. होणारे कार्यक्रम : सकाळी ९ वाजता - संत सेना महाराज मूर्तीपूजन , १० वाजता - सत्कार समारंभ , ११ वाजता - अल्पोपहार , ११.३० ते १.३० - दशावतारी नाटक , १.३० ते ३.०० - महाप्रसाद , ३.०० ते ५.०० - सांस्कृतिक कार्यक्रम ....कार्यक्रम स्थळ : भालचंद्र महाराज संस्थान , कणकवली. सदर दिवशी सर्व नाभिक बांधवांनी आपली सलूने बंद राहतील याबद्दल आपल्या गिऱ्हाईकांना पूर्वकल्पना द्यावी.

                                                                   आपले नम्र , 

अध्यक्ष / विभागीय अध्यक्ष / सर्व सचिव / सलूनमालक, सलूनचालक, महिला पदाधिकारी व तमाम कणकवली तालुक्यातील ज्ञातीबांधव   

Sunday, August 18, 2019

२७ ऑगस्ट - संत सेना महाराज पुण्यतिथी - कार्यक्रमाचे स्वरूप असे आहे


  1. सकाळी ९ ते १० - संत सेना  महाराज पूजन व आरती - सहभाग सर्व विभागीय अध्यक्ष व तालुका अध्यक्ष 
  2. सकाळी १० ते ११ - मान्यवरांचे स्वागत , सत्कार, समारंभपूर्वक कार्यक्रम , आभार प्रदर्शन 
  3. सकाळी ११ ते ११.३० - अल्पोपहार वितरण कार्यक्रम - सेवा - कणकवली शहर नाभिक सदस्य बांधव / भगिनी 
  4. सकाळी ११.३० ते दुपारनंतर १.३० - संयुक्त दशावतार मंडळाचा नाट्य प्रयोग - अनंत चव्हाण आणि मंडळी 
  5. दुपारनंतर १.३० ते ३.०० - भोजनाचा कार्यक्रम / महाप्रसाद वितरण - सेवा - कणकवली शहर नाभिक सदस्य  व तालुका महिला भगिनी 
  6. दुपारनंतर ३.०० ते ५.०० ( कार्यक्रम संपेपर्यंत ) - महिलांचे , मुलामुलींचे, नाभिकांचे सांस्कृतिक कार्यक्रम 

२७ ऑगस्ट - कार्यक्रम यादी सुरु आहे - नोंदणी करा


  1. फुगड्या - प्रिया प्रताप चव्हाण , प्रिया दशरथ चव्हाण , रचना राजन चव्हाण, शिवानी चंद्रशेखर चव्हाण, भक्ती विलास चव्हाण, संपदा मंगेश चव्हाण, वैष्णवी विठ्ठल लाड, प्रणिता लीलाधर पवार, तेजस्वीनी तुळशीदास कुबल, साक्षी संजय चव्हाण, मैथिली मंगेश चव्हाण, नंदा नंदकुमार चव्हाण, ईश्वरी प्रवीण कुबल 
  2. रेकॉर्ड डान्स - प्रदिप्ती तुळशीदास कुबल 
  3. रेकॉर्ड डान्स - तनिष्का प्रवीण कुबल आणि आर्या 
  4. विनोदी कार्यक्रम - अनिल सहदेव शिंदे 
  5. संस्कार स्तवन गीते - पूर्वालक्ष्मी अनिल शिंदे व ओमसाई अनिल शिंदे 

Saturday, August 17, 2019

उत्तीर्ण नाभिक मुलांची यादी


  1. मयूर महेश चव्हाण -  १२ वी  कॉमर्स - ५५.८५ %
  2. हर्षदा सुभाष चव्हाण - १० वी - ६३.२० %
  3. हेमंत सुभाष चव्हाण - १२ वी - ७१.३८ %
  4. दिक्षा नंदकिशोर चव्हाण - ६४ वा  नॅशनल स्कूल गेम्स २०१८-१९  कॅरम मुली - तामिळनाडू - गुणवत्ता प्रमाणपत्र 
  5. शैलजा शरद लाड - १२ वी  सायन्स - ६३.६९ %
  6. परमेश्वर दिलीप सकपाळ - १० वी - ५४ %
  7. पूर्वीलक्ष्मी अनिल शिंदे - कथाकथन - १ ली - द्वितीय क्रमांक 
  8. ओमसाई अनिल शिंदे - लोकमान्य टिळक भाषण स्पर्धा - प्रथम 
  9. संकेत रोहिदास चव्हाण - १२ वी - सायन्स - ५५.०८ %
  10. सायली चंद्रकांत चव्हाण - १२ वी - कॉम्पुटर - ७२.७७ % 
  11. निकिता दिलीप चव्हाण - १२ वी - वाणिज्य ७५.५४ %
  12. दिप्ती सुनिल चव्हाण -  १२ वी - कला - ७५.२३ %
  13. ओमकार देवदास चव्हाण - देवगड - एस टी . महामंडळ, सिक्युरिटी गार्ड ( वाघाची वाडी )

नाभिक महिलांनी आपला आत्मविश्वास वाढवा - संजना चव्हाण

कणकवली : दिनांक - १७ ऑगस्ट २०१९ : आपल्या नाभिक समाजातील महिलांनी मागे राहू नका, आपली मुले हुशार आहेत, त्यांना भरपूर शिकवा. नाभिक महिलांनी आपला आत्मविश्वास वाढवा . आपल्या व्यवसायाला कमी समजू नका, नाभिक व्यवसायानेच आपल्याला पुढे नेले आहे, म्हणून आपण नाभिक आहोत याचा सार्थ अभिमान बाळगा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ , मुंबई अंतर्गत शाखा कणकवलीच्या महिला सभेत अध्यक्षा संजना संजय चव्हाण यांनी महिलांना उद्देशून संदेश दिला.
          अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी सभा संपन्न झाली. सभेला कणकवली तालुक्यातील २५ महिला भगिनी उपस्थित होत्या. सर्वांनी तिवरे येथे पुरात वाहून गेलेल्या नाभिक बांधवांसाठी शोक व्यक्त केला. सरहद्दीवर शहिद झालेल्या जवानांसाठी श्रद्धांजली अर्पण केली.
           कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अलिशा अनिकेत वेतुरकर ( माजी जिल्हाध्यक्ष महिला संघटना ) उपस्थित होत्या. त्यांनी सांगितले कि, वैयक्तिक हेवेदावे विसरून एकत्र या आणि समाजासाठी चांगले काम करा. कणकवली तालुका नाभिक मंडळाच्या वतीने त्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. महिला सल्लागार दिप्ती चव्हाण म्हणाल्या, आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी नेटाने प्रयत्न करा, प्रत्येकाने प्रयत्न केले तर समाज नक्कीच विकासाच्या दिशेने वाटचाल करेल.
           त्यानंतर अभिलाषा अनिल शिंदे यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांनी बचतगट स्थापन करण्यासंदर्भात तपशीलवार मार्गदर्शन केले. सर्व महिलांनी संघटनेचा बचतगट स्थापन करण्याचे ठरवले. शिवानी चंद्रशेखर चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
          संत सेना  महाराज पुण्यतिथीच्या दिवशी महिलांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम करण्यासाठी नियोजन करण्यात आले. महिलांसाठीही ओळखपत्रे बनविण्याविषयी चर्चा झाली. पुढील सभेतील विषय ठरवण्यात आले.
          महिला सचिव हेमांगी अणावकर हिने महिलांच्या आरोग्यासाठी महिला डॉक्टरांना बोलावून मार्गदर्शन घेण्याविषयीचे विचार मांडले. भक्ती विलास चव्हाण यांनीही आपले विचार व्यक्त केले. सर्वांनी एकमेकांना मैत्री धागा बांधून ' नाभिक बंधन ' केले. सभेचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सचिव प्रवीण कुबल यांनी केले.













































Saturday, August 10, 2019

कणकवली नाभिक महिलांची सभा १७ ऑगस्टला

१७ ऑगस्टला होणार कणकवली नाभिक महिलांची सभा

              

कणकवली : दिनांक १० ऑगस्ट २०१९ : सेना महाराजांची पुण्यतिथी कणकवली तालुका नाभिक मंडळाच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरी केली जाणार आहे. यंदा २७ ऑगस्ट रोजी संत सेना महाराजांची पुण्यतिथी येत असल्याने त्यादिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात नियोजन करण्याच्या  उद्देशाने १७ ऑगस्ट रोजी कणकवली तालुका महिला नाभिक मंडळाची महिला सभा अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी भालचंद्र नगर येथे दुपारनंतर ठिक २. ३०  वाजता संपन्न होणार आहे. तरी सर्व कणकवली तालुक्यातील नाभिक महिलांना नम्र विनंती करण्यात येत आहे कि, सर्व ब्युटीपार्लरधारक , गृहिणी, विद्यार्थिनी , नाभिक कर्मचारी यांनी सभेला उपस्थित राहावे. सर्व कनेडी ,फोंडा,नांदगाव, तरेळे ,खारेपाटण विभागीय नाभिक महिला यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन  कणकवली तालुका  महिला नाभिक मंडळाच्या  सचिव हेमांगी अणावकर यांनी केले आहे. 

कणकवली तालुका नाभिक मंडळाची सहविचार सभा संपन्न

नाभिक समाजाने आपली संघटना मजबूत करावी  - जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांचे प्रतिपादन
कणकवली : दिनांक १० ऑगस्ट २०१९ : महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ, मुंबई संलग्न कणकवली शाखेची सहविचार सभा नुकतीच अनिल अणावकर त्यांच्या निवासस्थानी संपन्न झाली त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी उपस्थित कणकवली तालुका नाभिक बांधवांना संबोधित केले.
          ते म्हणाले, नाभिक बांधवांनी आपली संघटना मजबूत केली पाहिजे, आपले परस्पर हेवेदावे विसरून आपल्या बांधवांमध्ये जिव्हाळ्याचे वातावरण निर्माण केले पाहिजे. सचिव प्रवीण कुबल यांनी सभेतील सर्व विषय मांडले. सदर  विषयांवर विचार विनिमय व चर्चा करून निर्णय घेण्यात आले. २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाला म्हणजेच भव्य नाभिक मेळाव्याला शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले. त्यावेळी तालुक्यातील ६० पेक्षा जास्त नाभिक बांधव उपस्थित होते.
          २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मेळाव्यात विविध परीक्षांमध्ये  यशस्वी झालेल्या नाभिक विद्यार्थ्यांना  समारंभपूर्वक सन्मानित करण्यात येणार आहे. आदर्श नाभिक कार्यकर्ता, कणकवली नाभिक रत्न पुरस्कार देऊन नाभिक बांधवांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे कनेडी , फोंडा, खारेपाटण, तरेळे , नांदगाव, कणकवली विभागातील सर्व १० वी , १२ वी , १५ वी , पदव्युत्तर , खेळाडू,  नवीन नोकरीस लागलेले नाभिक मुले, मुली यांनी आपली गुणपत्रकाची झेरॉक्स ९८८१४७१६८४ या नंबरवर पाठवावी. किंवा विभागीय अध्यक्ष यांच्याकडे १७ ऑगस्ट पर्यंत जमा करावी.
          महिला ब्युटिशियन , ज्येष्ठ नाभिक कारागीर, ज्येष्ठ नाभिक यांचादेखील सत्कार केला जाणार असल्याने त्यांनी आपली माहिती वेळीच संघटनेकडे द्यावी. सर्व मुलांना, मुलींना , महिलांना व पुरुष कलाकारांना सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची संधी याद्वारे उपलब्ध केली असून ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांनी तालुका सचिव प्रवीण कुबल यांच्याशी संपर्क साधावा.
          संत सेना महाराजांची पुण्यतिथी सकाळी मूर्तिपूजन करून साजरी केली जाईल. सकाळी ९ वाजता सर्व विभागीय अध्यक्ष पूजन करतील. १० वाजता समारंभपूर्वक सत्कार समारंभ होईल. परमहंस भालचंद्र संस्थानातील भक्तनिवासाच्या  तळमजल्यावर कार्यक्रम संपन्न होईल. ठिक  ११.३० वाजता दशावतारी नाटकाचा प्रयोग होईल. त्यानंतर महाप्रसाद दिला जाईल. भोजनानंतर उपस्थित नाभिक बांधवांचा , भगिनींचा  सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल. तरी या भव्य नाभिक मेळाव्यामध्ये कणकवली तालुक्यातील तमाम नाभिक बांधवांनीं सहभागी व्हावे, असे नम्र आवाहन तालुक्याचे अध्यक्ष लक्ष्मीकांत चव्हाण यांनी केले आहे. कनेडी विभागाचे नूतन अध्यक्ष म्हणून नंदू चव्हाण यांची निवड करण्यात आली.
         




🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...