Wednesday, January 27, 2021

आमदार वैभव नाईक यांना नाभिक संघटनेचे निवेदन सविनय सादर

शासनाकडील *नाभिक समाजाच्या प्रलंबित मागण्या* मंजूर करण्यासाठी आवाज उठवण्यासाठी आमदारांमार्फत पाठपुरावा करण्याची नाभिक संघटनेची राज्यभरातून निवेदने सादर

 *कणकवली* दिनांक :  २५ जानेवारी २०२१

          सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या वतीने सर्व आमदारांना प्रलंबित मागण्यांविषयी आवाज उठवण्याच्या दृष्टीने नाभिक समाजाच्या प्रलंबित मागण्या लेखी निवेदनपत्राने सादर करण्यात आल्या. 

          निवेदन सादर करताना जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण , तालुका सदस्य दशरथ चव्हाण , जिल्हा सल्लागार सुभाष चव्हाण , केंद्रसंघटक अरुण चव्हाण , सचिव प्रवीण कुबल आदी उपस्थित होते. 

          आमदार वैभव नाईक म्हणाले , " कुडाळ विधानसभा मतदारसंघात नाभिक संघटनेची दोन गुंठे स्वतःची  जागा असल्यास ' नाभिक भवन ' बांधकामासाठी पंधरा लाखापर्यंतचे सहकार्य देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करु. त्यासाठी जागा संघटनेच्या नावे विकत घ्या. "  

          *शासनाकडून प्रलंबित असलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :* 

१ ) बारा बलुतेदारांच्या विकासासाठी बारा बलुतेदार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे व त्यास दरवर्षी पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. 

२ ) कोरोना कालावधीमध्ये आत्महत्याग्रस्त नाभिक समाजबांधवांस दहा लक्ष रुपये आर्थिक सहकार्य करण्यात यावे.

३ ) दिनांक २६ मार्च १९७९ च्या महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्राप्रमाणे नाभिक समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस करावी. 

४ ) प्रतापगडावर शूरवीर जिवबा महाले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे व त्यासाठी निधीची तरतूद उपलब्ध करून द्यावी. 

५ ) स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार क्रांतिवीर हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या नावाने बारा बलुतेदारांसाठी सबलीकरण योजना राबवावी.

६ ) रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करावी.  

७ ) नाभिक समाजाच्या सलून कारागिरास दरमहा १५,००० रुपये निवृत्ती वेतन ( पेन्शन ) लागू करावी. 

          वरील मागण्या पूर्ण व्हायच्या असतील तर सर्व नाभिक बांधवांनी जागरुक झाले पाहिजे. सर्व नाभिक बांधवांनी संघटितपणे संघर्ष व पाठपुरावा केल्यास अशक्यप्राय गोष्टी शक्य होऊ शकतात.

©️ *सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक जनहितार्थ जारी*

आमदार मा. नितेश राणेसाहेब यांना सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे निवेदन सविनय सादर

 *आमदार मा. नितेश राणेसाहेब यांना सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे निवेदन सविनय सादर* 

शासनाकडील *नाभिक समाजाच्या प्रलंबित मागण्या* मंजूर करण्यासाठी आवाज उठवण्यासाठी आमदारांमार्फत पाठपुरावा करण्याची नाभिक संघटनेची राज्यभरातून निवेदने सादर

 *कणकवली* दिनांक :  २६ जानेवारी २०२१

          सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या वतीने सर्व आमदारांना प्रलंबित मागण्यांविषयी आवाज उठवण्याच्या दृष्टीने नाभिक समाजाच्या प्रलंबित मागण्या लेखी निवेदनपत्राने सादर करण्यात आल्या. 

          निवेदन सादर करताना जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण , तालुका सदस्य दशरथ चव्हाण , केंद्रसंघटक महेश शिवराम चव्हाण  , केंद्रसंघटक संजय कुबल  , सचिव प्रवीण कुबल आदी उपस्थित होते. 

          आमदार नितेश राणेसाहेब म्हणाले , " सिंधुदुर्ग नाभिक संघटनेच्या मागण्या चांगल्या व रास्त आहेत. आपण त्यासाठी विधीमंडळात नक्कीच आवाज उठवू "  

          *शासनाकडून प्रलंबित असलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :* 

१ ) बारा बलुतेदारांच्या विकासासाठी बारा बलुतेदार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे व त्यास दरवर्षी पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. 

२ ) कोरोना कालावधीमध्ये आत्महत्याग्रस्त नाभिक समाजबांधवांस दहा लक्ष रुपये आर्थिक सहकार्य करण्यात यावे.

३ ) दिनांक २६ मार्च १९७९ च्या महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्राप्रमाणे नाभिक समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस करावी. 

४ ) प्रतापगडावर शूरवीर जिवबा महाले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे व त्यासाठी निधीची तरतूद उपलब्ध करून द्यावी. 

५ ) स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार क्रांतिवीर हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या नावाने बारा बलुतेदारांसाठी सबलीकरण योजना राबवावी.

६ ) रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करावी.  

७ ) नाभिक समाजाच्या सलून कारागिरास दरमहा १५,००० रुपये निवृत्ती वेतन ( पेन्शन ) लागू करावी. 

          वरील मागण्या पूर्ण व्हायच्या असतील तर सर्व नाभिक बांधवांनी जागरुक झाले पाहिजे. सर्व नाभिक बांधवांनी संघटितपणे संघर्ष व पाठपुरावा केल्यास अशक्यप्राय गोष्टी शक्य होऊ शकतात.

©️ *सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक जनहितार्थ जारी*

मा. नारायणराव राणेसाहेब यांना सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे निवेदन सविनय सादर

 *मा. नारायणराव राणेसाहेब यांना सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे निवेदन सविनय सादर* 

शासनाकडील *नाभिक समाजाच्या प्रलंबित मागण्या* मंजूर करण्यासाठी आवाज उठवण्यासाठी आमदारांमार्फत पाठपुरावा करण्याची नाभिक संघटनेची राज्यभरातून निवेदने सादर

 *कणकवली* दिनांक :  २७ जानेवारी २०२१

          सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या वतीने सर्व आमदारांना प्रलंबित मागण्यांविषयी आवाज उठवण्याच्या दृष्टीने नाभिक समाजाच्या प्रलंबित मागण्या लेखी निवेदनपत्राने सादर करण्यात आल्या. 

          निवेदन सादर करताना जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण , केंद्रसंघटक महेश कृष्णा चव्हाण  , केंद्रसंघटक महेश शिवराम चव्हाण आणि तालुका खजिनदार रमेश आचरेकर आदी उपस्थित होते. 

          मा. नारायणराव राणेसाहेब म्हणाले , " सिंधुदुर्ग नाभिक संघटनेच्या मागण्या चांगल्या व रास्त आहेत. आपण त्यासाठी विधीमंडळात नक्कीच आवाज उठवू "  

          *शासनाकडून प्रलंबित असलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :* 

१ ) बारा बलुतेदारांच्या विकासासाठी बारा बलुतेदार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे व त्यास दरवर्षी पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. 

२ ) कोरोना कालावधीमध्ये आत्महत्याग्रस्त नाभिक समाजबांधवांस दहा लक्ष रुपये आर्थिक सहकार्य करण्यात यावे.

३ ) दिनांक २६ मार्च १९७९ च्या महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्राप्रमाणे नाभिक समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस करावी. 

४ ) प्रतापगडावर शूरवीर जिवबा महाले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे व त्यासाठी निधीची तरतूद उपलब्ध करून द्यावी. 

५ ) स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार क्रांतिवीर हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या नावाने बारा बलुतेदारांसाठी सबलीकरण योजना राबवावी.

६ ) रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करावी.  

७ ) नाभिक समाजाच्या सलून कारागिरास दरमहा १५,००० रुपये निवृत्ती वेतन ( पेन्शन ) लागू करावी. 

          वरील मागण्या पूर्ण व्हायच्या असतील तर सर्व नाभिक बांधवांनी जागरुक झाले पाहिजे. सर्व नाभिक बांधवांनी संघटितपणे संघर्ष व पाठपुरावा केल्यास अशक्यप्राय गोष्टी शक्य होऊ शकतात.

©️ *सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक जनहितार्थ जारी*

Monday, January 25, 2021

कणकवली नाभिक महिला कार्याध्यक्षपदी प्रिया दशरथ चव्हाण

 कणकवली : दिनांक २५ जानेवारी 

          कणकवली तालुका नाभिक महिला आघाडी संघटनेच्या वतीने ३ फेब्रुवारी रोजी ' हळदीकुंकू ' कार्यक्रम दुपारनंतर ३ ते ६ या वेळेत कणकवली येथील अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी करण्यात येणार आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी महिला आघाडीची सभा लावण्यात आली होती. 

          त्यावेळी व्यासपीठावर कणकवली तालुकाध्यक्षा संजना संजय चव्हाण , तालुका सल्लागार दिप्ती दत्ताराम चव्हाण , जिल्हा सदस्या रचना राजन चव्हाण , ज्येष्ठ सदस्या नंदा नंदकुमार चव्हाण , सचिव ईश्वरी प्रवीण कुबल , सहसचिव हेमांगी अनिल अणावकर प्रामुख्याने उपस्थित होत्या. 

          संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकारी महिलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. अतिपरिणामकारक व्यक्तींच्या सात सवयींविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. नाभिक  महिलांनी आपला सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे सांगण्यात आले. तालुकाध्यक्षा यांना सहाय्य करण्यासाठी नवीन पदाची निर्मिती करण्यात आली. 

          कणकवली नाभिक महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष पदी प्रिया दशरथ चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. महिला संवर्धन निधी गोळा करण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. 

          तसेच हळदीकुंकू समारंभाचे औचित्य साधून ' महिलांसाठी योगाचे महत्त्व ' या विषयावर  योगवल्लरीच्या योगशिक्षिका ज्योती पंडित यांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले आहे. तरी या संपूर्ण कार्यक्रमाला कणकवली तालुका नाभिक महिलांनी उपस्थित राहून संघटनेचा उपक्रम उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ कणकवली तालुका संघटनेचे सचिव प्रवीण कुबल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. सभेला २० पेक्षा जास्त नाभिक महिला भगिनी उपस्थित असल्याबद्दल सहसचिव हेमांगी अणावकर यांनी आभार व्यक्त केले.

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...