कणकवली तालुका नाभिक मंडळाची सभा दि. २२/०७/२०१७ रोजी शनिवारी ठिक २.३० वाजता आयोजित करण्यात आली. श्री. लक्ष्मीकांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली.
त्त्यावेळी खालील ज्ञातिबांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
त्त्यावेळी खालील ज्ञातिबांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
- विजय सि. चव्हाण
- लक्ष्मीकांत चव्हाण
- अनिल अणावकर
- आनंद आचरेकर
- चंद्रकांत भिकाजी चव्हाण
- प्रवीण अशितोष कुबल
- नंदकुमार शंकर चव्हाण
- पांडुरंग बाबुराव साळोखे
- समीर सदानंद चव्हाण
- भिकाजी शिवराम चव्हाण
- अनंत भिकाजी चव्हाण
- रवींद्र गणपत चव्हाण
- संजय गोविंद चव्हाण
- चंद्रशेखर सुरेश चव्हाण
- गुरुदास सत्यवान चव्हाण
- मनोज वसंत चव्हाण
- प्रकाश श्रीधर लाड
- शरद पुंडलिक लाड
- गणेश शेट्ये
- महादेव शंकर चव्हाण
- नामदेव न्हावी
- प्रसाद संभाजी चव्हाण
- रामदास धाकू चव्हाण
- निलेश पांडुरंग चव्हाण
- चंद्रकांत राघो चव्हाण
- राजेश शिवराम चव्हाण
- अमोल एकनाथ चव्हाण
- अजित हरिश्चंद्र चव्हाण
- संजय अनंत कुबल
- संजय शि. चव्हाण
- कृष्णा मधुकर चव्हाण
- श्रीकांत टाकळे
- श्यामसुंदर शा. चव्हाण
- महेश कृष्णा चव्हाण
- गोपाळ सु. लाड
- प्रवीण संतोष चव्हाण
- सुनील गो. चव्हाण
- प्रवीण स. चव्हाण
- जयेश शिवाजी चव्हाण
- शंकर यशवंत चव्हाण
- सुभाष लक्ष्मण चव्हाण
- अनिल सहदेव शिंदे
त्यावेळी खालील विषयांवर चर्चा करण्यात आली.
विषय क्र. १ ) इतिवृत्त वाचन : मागील सभा दि. ३/१२/१६ रोजीचे इतिवृत्त वाचून दाखवण्यात आले. ते वाचून सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
विषय क्र. २ ) संत सेना महाराज पुण्यतिथीविषयक चर्चा - १९ ऑगस्ट २०१७ रोजी आपले दैवत श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी असल्याने ती साजरी करण्याच्या दृष्टीने विचार विनिमय व चर्चा करणेत आली.
८.३० ते ९ - संत सेना महाराज मूर्तीपूजन व तीर्थप्रसाद
१० ते ११ - १० वी , १२ वी , १५ वी उत्तीर्ण मुला-मुलींचा सत्कार ( भेटवस्तू व प्रमाणपत्र )
शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण , MTS, NTS, इतर अवांतर बाह्य परीक्षा उत्तीर्ण मुलांचा सत्कार समारंभ
६० वर्षे वयोगटातील अजूनही सलूनमध्ये काम करून सेवा देत असलेले वयोवृद्ध नाभिक बांधव यांचाही शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देवून सत्कार
६० पेक्षा अधिक वयोगटांच्या ज्येष्ठ नागरिकांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार
नांदगाव विभाग - आदर्श नाभिक पुरस्कार देणे.
११ ते १२ - दशावतारी नाट्य प्रयोग - अनंत चव्हाण ( करंजेकर ) यांचा मनोरंजक कार्यक्रम आयोजित करणे.
त्यावेळी कार्यक्रमाचा खर्च किती येईल हे अपेक्षित नसल्यामुळे प्रत्येक दुकानाला २०० रुपये वर्गणी बसवण्यात आली. तसेच दुकानात काम करणाऱ्या कारागिरांनी स्वेच्छेने १०० रुपये देणेस हरकत नाही असे ठरले.
जेवण मेनू - गोड डाळ, बटाटा भाजी , शिरा इ. ठरवण्यात आला. प्रसाद म्हणून लाह्यांचा प्रसाद वाटण्याचे ठरले.
सजावट किंवा भांड्यांची जमवाजमव करण्याच्या दृष्टीने १८ ऑगस्ट १७ रोजी शुक्रवारी सर्वांनी दुपारी तीन वाजता अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी जमवायचे आहे असे ठरले.
सत्कारमूर्तींनी १० ऑगस्टपर्यंत मार्कलिस्टची झेरॉक्स देणेसाठी विनंती करणेत आली.
विषय क्र. ३ ) आयत्या वेळचे विषय -
अ ) कणकवली हायवेवरील ज्यांची दुकाने जाणार आहेत त्यांची व्यथा मांडण्यात आली. यावर शासकीय कार्यवाही होणार असल्याने त्यांचे पुनर्वसन शासकीय पद्धतीने झाले तरीही त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले असल्याचे सांगण्यात आले.
ब ) वनभोजन खर्चाबाबत चर्चा झाली.
क ) गणेशोत्सव काळात सोमवारी दुकाने उघडी ठेवण्याबाबत ठरविण्यात आले.
ड ) सर्वांनी संघटनेने दिलेले दर घेणेसाठी नम्रपणे विनंती करण्यात आली.
ई ) नाभिक कार्यकर्त्याच्या घरात एखादी दु:खद घटना घडल्यास .... ८ दिवस होऊन गेले असतील तर संत सेना पुण्यतिथी कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडावा. २/३ दिवसच झाले असल्यास पुण्यतिथी साध्या प्रकारे साजरी करावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
फ ) नाभिक ज्ञाती बांधवाच्या घरी एखादी दु:खद घटना घडली असल्यास ' अध्यक्षांना फोन करून दुकाने बंद ठेवण्याबाबत ठरवावे. / आपली सामाजिक बांधिलकी समजून आपल्या नाभिक समाज बांधवांसाठी २ तास तरी दुकान बंद ठेऊन आपापल्या परीने श्रद्धांजली अर्पण करावी. / यावेळी कोणावरही दुकाने सक्तीने बंद करण्यासाठी भाग पडू नये. / मृत्यूची घटना घडली असल्यास आपण त्या स्थळापासून जवळ असल्यास ' अंत्यसंस्कार' विधीसाठी उपस्थित राहून आपण आपल्या ज्ञातिबांधवांना मानसिक आधार द्यावा. / लगेचच जायला जमले नाही तर नंतरच्या १०-११ दिवसात प्रत्यक्ष जाऊन किंवा फोन करून सांत्वन करावे.
ग ) यानंतर नाभिक समाज जनगणना फॉर्म, सलून कारागीर गणना फॉर्म, वधूवर मेळावा इ. विषयी जनरल माहिती देण्यात आली. पुण्यतिथी कार्यक्रमाला येताना फॉर्म घेऊन आल्यास जमा करून घेतले जातील असे सांगण्यात आले.
ह ) राज्य उपाध्यक्ष श्री. विजय चव्हाण , मालवण तालुकाध्यक्ष श्री. आनंद आचरेकर यांनी नाभिक पतसंस्थेमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. दरमहा काही रक्कम जमा करावी व कर्जदारांनी आपले हफ्ते नियमित भरणेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
आभार प्रदर्शनाने सभेची सांगता झाली.





















