Monday, September 11, 2023

संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी झाली अनेक उपक्रमांनी

 🛑 आज अतिशय छान कार्यक्रम संपन्न झाला.

▪️संत सेना महाराजांच्या मूर्तीचे पूजन मा. अनंत चव्हाण ( माजी विभागीय अध्यक्ष खारेपाटण ) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. 

▪️आरतीचा मान यंदा पहिल्यांदा सर्व विभागातील पदाधिकारी यांना देण्यात आला. सर्वांनी सेना महाराजांच्या मूर्तीला मनोभावे आरती ओवाळली. 

▪️कणकवली शहराध्यक्ष अनिल शिंदे यांच्या सुमधुर आवाजाने आरतीला अधिक भक्तिमय स्वरुप प्राप्त झाले. 

▪️कणकवली तालुक्यातील सर्व विभागातील बहुसंख्य नाभिक बंधु आणि भगिनी आरतीला उपस्थित होते.

▪️सर्वांनी मनोभावे सेना महाराजांना अभिवादन व वंदन केले. 

▪️सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

▪️भालचंद्र महाराज भक्त निवासांमध्ये पुढील कार्यक्रमासाठी सर्व नाभिक निघाले. 

▪️आरोग्य तपासणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातून 5 डॉक्टर्स , 16 स्टाफ नर्स आणि 5 इतर आरोग्य कर्मचारी आले होते. त्यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते समारंभपूर्वक दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. 

▪️अल्पोपहार व चहा देण्यात आला. 

▪️डॉक्टरांनी 100 पेक्षा जास्त नाभिक बांधवांची आरोग्य तपासणी केली. डोळे , नाक , कान , घसा , रक्तदाब , मधुमेह , मतिमंद मुले , दात , महिलांचे आजार , थायरॉईड इत्यादी अनेक गोष्टींची वैयक्तिक स्तरावर तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार औषधे देण्यात आली. काहींना पुढील उपचारांसाठी संदर्भीत करण्यात आले. कोणतीही फी न घेता संपूर्ण मोफत तपासणी करण्यात आली. 

▪️कणकवली नाभिक संघटनेच्या वतीने सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प , श्रीफळ व आभारपत्र देऊन ऋण व्यक्त करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरुपात एका महिला डॉक्टरांचा शाल पांघरुन हृदय सत्कार करण्यात आला. डॉक्टरांनी आपले मनोगत व्यक्त केले. नाभिक संघटनेने केलेल्या आदरातिथ्याबद्दल सर्व डॉक्टर , नर्स अतिशय खुश होऊन गेले होते. 

▪️आरोग्य तपासणी सलग दोन ते अडीज तास सलगपणे चालली. अनेक लाभार्थींनी अनेक चाचण्या मोफत करुन मिळाल्याबद्दल संघटनेच्या उपक्रमाचे तोंड भरुन कौतुक केले. सर्व डॉक्टर व नर्स यांची भोजन व्यवस्था संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. आतापर्यंतच्या अनेक उपक्रमांपैकी आज संपन्न झालेला उपक्रम सर्वांसाठी अधिक समाजोपयोगी झाल्याचे दिसून आले. लोकांनीही डॉक्टरांचे विशेष आभार व्यक्त केले.

▪️कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि महिला आघाडी , युवा पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन सामुदायिक स्वागत करण्यात आले. 

▪️कणकवली शहराध्यक्ष अनिल शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये कणकवली संघटनेच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. आपण हे उपक्रम समाजाच्या हितासाठी राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.

▪️10 वीच्या 17 आणि 12 वीच्या 6 विद्यार्थ्यांना शैक्षणिक फाईल आणि आकर्षक प्रमाणपत्र देऊन मा. खरातसाहेब ( कणकवली पोलीस अधिकारी PSI ) यांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.

▪️कणकवली तालुक्यातील आठ विभागातील 18 जणांना आदर्श नाभिक पुरस्कार देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व आकर्षक लॅमिनेटेड प्रमाणपत्र देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात आले. 

▪️विठ्ठलभक्त सेना या नाटकामध्ये वारकरी म्हणून भूमिका केलेल्या सर्वांचा प्रमाणपत्रे व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. 

▪️ग्रामपंचायत सदस्या असलेल्या दोन महिला नाभिकांचा शाल , श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

▪️पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल माजी महिलाध्यक्षा संजना संजय चव्हाण यांना गौरवपत्र , शाल , श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराला उत्तर देताना त्यांना सर्व पदाधिकारी यांचा उल्लेख करत ऋण व्यक्त केले.

▪️सर्व माजी तालुकाध्यक्ष , विभागीय अध्यक्ष यांना प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. 

▪️कणकवली तालुका उपाध्यक्ष निलेश चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले. 

▪️कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने नियोजित होता. त्यामुळे सर्वांनी कार्यकारिणीचे विशेष आभार मानले. उपस्थित सर्वांनी नाभिक संघटनेसाठी सदस्यत्व फी व वर्गणी दिली. 

▪️सर्व कमिटीमधील सर्व सदस्यांनी अतिशय मन लावून शेवटपर्यंत कामे केली. सर्वांनी पदाधिकारी असूनही माझ्या घरातील कार्यक्रम आहे अशी कामे करताना दिसत होते. संघटना वाढत असल्याबद्दल अनेक ज्येष्ठांनी स्पष्ट शब्दात युवा पिढीला धन्यवाद दिले. 

©️ तालुका सरचिटणीस , 

कणकवली तालुका नाभिक संघटना

























































































































🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...