🔴 कणकवलीत सलून ब्युटी पार्लर असोसिएशन स्थापन होणार, नाभिक बांधवांना सदस्यत्वाची हाक!
कणकवली: सलून ब्युटी पार्लर व्यवसायात कार्यरत असलेल्या बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कणकवली तालुक्यात सलून ब्युटी पार्लर असोसिएशनची स्थापना करण्यात येणार असून, यासाठी सर्व नाभिक बांधवांना सदस्यत्व घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई येथील सलून ब्युटीपार्लर असोसिएशन (मान्यताप्राप्त ट्रेड युनियन संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन) च्या वतीने ही संघटना स्थापन केली जात आहे.
नुकतीच मेकअप आर्टिस्ट आणि असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद लाड, हेअर आर्टिस्ट सचिन टक्के, तुषार चव्हाण आणि किसन कोऱ्हाळे यांनी कणकवलीला भेट देऊन सलून ब्युटी पार्लर असोसिएशनसाठी सभासद अर्ज वितरित केले आहेत.
सदस्यत्वाचे फायदे आणि प्रक्रिया:
या असोसिएशनचे सदस्यत्व दोन वर्षांसाठी असेल. एका वर्षाची सदस्यत्व फी २७५ रुपये असून, दोन वर्षांसाठी एकूण ५५० रुपये भरावे लागतील. कणकवली तालुक्यातील जास्तीत जास्त सलून व्यावसायिकांनी यात सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सोमवारी 9 जून 2025 रोजी होणाऱ्या सभेच्या दिवशी सर्व इच्छुक सदस्यांनी ५५० रुपये शुल्क घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांचे स्वतःचे सलून किंवा सलून मध्ये काम करणाऱ्या कारागिरांनी सुद्धा सदस्यत्व स्वीकारायचे आहे. सदस्यत्व घेताना आपली जन्मतारीख, ब्लड ग्रुप आणि आधार कार्ड इत्यादी माहिती सोबत आणणे आवश्यक आहे.
🔸 असोसिएशनकडून मिळणारे लाभ:
सलून ब्युटी पार्लर असोसिएशनच्या माध्यमातून सदस्यांना अधिकृत आयडेंटिटी कार्ड आणि विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे, पेन्शन योजना सुरू करता येईल असेही असोसिएशनने सांगितले आहे.
कणकवली तालुका नाभिक संघटनेचे तालुका अध्यक्ष रोशन मनोहर चव्हाण, तालुका उपाध्यक्ष निलेश चव्हाण, तालुका कार्याध्यक्ष संजय कुबल, तालुका सरचिटणीस प्रवीण कुबल, तसेच नाभिकनेते अनिल अणावकर आणि जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण यांनी सर्व नाभिक सलून बांधवांना या असोसिएशनमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून सदस्यत्व घेण्याची नम्र विनंती केली आहे.
या असोसिएशनमुळे सलून ब्युटी पार्लर व्यावसायिकांना संघटित होऊन त्यांच्या हितासाठी कार्य करण्याची संधी मिळणार आहे.
©️ कणकवली तालुका नाभिक संघटना













