Wednesday, October 31, 2018

आरती संत सेना महाराजांची आरती स्वामी संता ….सेना विठ्ठल भक्ता……. नमितो तुज चरणी ….स्वामी तुज कुलवंता…….!! धृ !! जन्म झाला नाभिक वंशी ….मस्तक विठ्ठलापाशी सेवा करी मानवाची …..मनी नसे दुजाभावा……!! १ !! शस्त्र करी घेउनिया…...ज्ञातीजना उद्धरिले……. वीणा, चिपळ्या तुझ्या हाती…..केले प्रकट भगवंता…!! २ !! राजा रंक गिऱ्हाईक….आम्ही वारीक वारीक ….. निरोप येता बादशाही ….वारीक होई पंढरीनाथा……!! ३ !! संत होती बहुतची ….परी अमुचा तू एक…….. मस्तक ठेवितो चरणी ….आता उद्धरी तू भक्ता……..!! ४ !! रचना : श्री. अशितोष तुकाराम कुबल. माजी जिल्हा उपाध्यक्ष सिंधुदुर्ग


No comments:

Post a Comment

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...