नाभिक जनतेवर नेहमी वरदहस्त ठेवणारी भराडी माता , सर्वांची मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी कणकवली नाभिक बांधव पायी वारी नेतात. यावर्षी दोन वेळा नाभिक वारी ठरवून ती साध्य करता आलेली नाही. विविध अडचणी आल्याने ती पूर्ण न करता आल्याची खंत कायम बोचत राहू नये, म्हणून उद्या आपली नाभिक वारी आपण पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. ज्यांना त्यामध्ये सामील व्हायचे आहे, त्यांनी उत्स्फूर्त सहभाग द्यायचा आहे. आपल्या नाभिक बांधवांचा उपक्रम पूर्ण करणे हेच उद्दिष्ट नसून अखिल नाभिक मानवजातीच्या कल्याणासाठी आपण नाभिक वारी संपन्न करत आहोत. देवीला साकडे घालून देवीसमोर नतमस्तक होत तिला मनोमन शरण यायचे आहे. आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्यांचे क्षालन होण्यासाठी आपण सामुहिकरित्या तिला गाऱ्हाणे घालणार आहोत.
जाताना आपण पायी जाणार नसून आपापल्या वाहनाने जाणार आहोत. ज्यांना वाहनाची सोय होत नसेल त्यांनी ठिक सकाळी ९ वाजता श्री. अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी उपस्थित राहायचे आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत ११ वाजता तिथे पोहोचायचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येणारे इतर तालुक्यांमधील नाभिक देखील त्यांच्या श्रद्धेप्रमाणे तिथे येतील अशी आपण आशा करूया. निर्मळ भक्तीने येणाऱ्या सर्वांचे आपल्या वारीमध्ये स्वागतच असेल. संख्या जास्त झाल्यास आपणास योग्य गाड्यांची व्यवस्था करता येऊ शकते.
ज्यांना ठामपणे यायचे असेल त्यांनी कृपया कणकवली नाभिक whats app group वर आपले नाव लिहून कळवावे. म्हणजे आम्हाला संख्या समजेल. त्यानुसार traveller ठरवता येईल. कळावे. यात काही बदल असेल तरच कळवण्यात येईल, नाहीतर हाच संदेश समजून आपण आपल्या नाभिक भक्ती वारीत आपल्या बंधू भगिनीसह सामील होण्यास आग्रहाची विनंती आहे. काही शंका असल्यास कुबलसरांना फोन करा. धन्यवाद.

No comments:
Post a Comment