Friday, January 18, 2019

कणकवली तालुका नाभिक वारी निघणार २८ जानेवारी रोजी सोमवारी

२४ डिसेंबर रोजी कणकवली नाभिक वारी रद्द झाल्याने ती वारी आता २८ जानेवारी रोजी सोमवारी निघणार आहे. तेव्हा सर्व कणकवली तालुका नाभिक मंडळ सदस्यांनी त्याचा लाभ घ्यावा हि नम्र विनंती.

  1.  सोमवारी सकाळी ठिक ५.३० वाजता अनिल अणावकर यांच्या निवासस्थानावरून नाभिक वारी निघेल. 
  2. ६ वाजता परमहंस भालचंद्र महाराज मंदिरातून नमस्कार करून वारीचे प्रस्थान होईल.
  3. संत सेना महाराज की जय , नाभिक सेना झिंदाबाद, नाभिक एकतेचा विजय असो अशा घोषणा देत वारी पुढे पुढे निघेल.
  4. कणकवली, कनेडी, खारेपाटण, तरेळे, फोंडा, नांदगाव पासून सर्व नाभिक बांधव कणकवली नाभिक वारीत सहभागी होतील.
  5. गेल्या वर्षी जशी शेकडोंच्या संख्येने वारीमध्ये सहभागी होत नाभिक समाजाने आपली वारी यशस्वी करून दाखवली होती, तशीच यंदाही त्याहीपेक्षा जास्त संख्येने वारीमध्ये सहभागी होऊन संघटनेची एकता व ताकद इतर समाजांना दाखवून देतील.
  6. वारीमध्ये दिंड्या, पताका, गाणी इत्यादींचा अभिनवपणे वापर करत सर्व लहानथोर नाभिक बंधू भगिनी संत सेना सागरात न्हाऊन निघेल.
  7. ८ वाजेपर्यंत गोठणे वड मुक्कामी दाखल होतील. तेथे त्यांना नाश्त्याची सोय दरवर्षीप्रमाणे सुभाष कुबल, भरत कुबल व नारायण कुबल हे करतील.
  8. त्यानंतर वारी पुढे जायला निघेल. बेळणे येथे रमेश आचरेकर यांच्या सौजन्याने आईस्क्रीमची सोय करण्यात येईल. 
  9. त्याच ठिकाणी विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी वारीला सामोरे जातील. 
  10. त्यानंतर वारी विरण पोईप करत भोजनासाठी योग्य ठिकाणी थांबेल.
  11. त्याच ठिकाणी मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, देवगड येथील ज्ञातिबांधव वारीमध्ये सामील होतील. ज्यांना सामील व्यायचे आहे त्यांनी आपल्या गाडीने येऊ शकतात.
  12. परंतु जे पदयात्रेत सामील होऊन भराडी देवीच्या चरणी नतमस्तक होतील त्यांनी वाटेत कोठेही आपल्या सोयीप्रमाणे वारीमध्ये सामील होऊ शकतील.
  13. कोणालाही वारीला येणे आमच्या नाभिक समाजासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. वारीत कोणीही म्हणजे इतर समाजाचे लोकही सामील होऊ शकतात.


No comments:

Post a Comment

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...