गेली तीन वर्षे सलग जिल्हा नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , खजिनदार चंद्रशेखर चव्हाण , टू-व्हीलर असोसिएशनचे कणकवलीचे सचिव दशरथ उर्फ पिंट्या चव्हाण यांच्या आर्थिक सहकार्याने व कणकवली तालुका नाभिक मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने ' नाभिक पायी वारी ' हा उपक्रम मोठ्या स्तरावर राबवला जात आहे. तीन वर्षे जिल्ह्यातील तमाम नाभिक बांधव त्यामध्ये स्वेच्छेने सामील होत आहेत. दरवर्षी येणाऱ्या नाभिक व अनाभिक बांधवांची संख्या वाढत चाललेली आहे.
यंदादेखील संघटनेची नाभिक वारी दि. २४ डिसेंबर रोजी सोमवारी आयोजित केली होती. परंतु जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांच्या मोठ्या बहिणीचे पती यांचे आकस्मिक निधन झाल्याने दुसऱ्याच दिवशी आयोजित केलेली नाभिक वारी रद्द करण्यात आली.
त्यानंतर दोन दिवसांपूर्वी आपण २८ जानेवारीला ' नाभिक वारी ' अशा प्रकारे सर्वांना whats app च्या माध्यमातून संदेश पाठवले. कालच आपले जिल्हा उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत चव्हाण ( कुडाळ - साळगाव ) यांचे अपघाती निधन झाले आणि संघटनेवर शोककळा पसरली.
त्यामुळे आपली ठरलेली ' नाभिक वारी ' न्यायची की नाही या संभ्रमात असताना त्याचे उत्तर आपल्याला सापडले आहे. आपण आपली ' नाभिक वारी ' नेणार आहोत. पण दरवर्षीप्रमाणे आपण नाभिक वारी पायी न नेता ती गाडीने जाऊन पूर्ण करणार आहोत.
दोन दुर्घटना घडलेल्या असताना आपण त्यातून मार्ग काढत देवीकडे साकडे घालण्याच्या उद्देशाने जात आहोत. त्यासाठी आपण महत्त्वाच्या व्यक्तीशी बोलून सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न साधत आहोत. आपल्या दोन्ही जिल्हा बांधवांच्या अध्यक्ष्यांच्या व उपाध्यक्षांच्या कुटुंबांना झालेला शोक व आपल्याला झालेला शोक सारखाच आहे अशी आमची धारणा आहे. आम्ही या दोघांच्याही दुःखात सहभागी आहोत. संघटना दोन्ही व्यक्तींच्या पाठीशी राहणार आहे. त्यासाठी सर्व नाभिक कार्यकर्त्यांनी हाक देताच पाठींबा दर्शविण्याची जबाबदारी राहणार आहे. आपण सर्वांनी मिळून हे नक्कीच करू शकता. कारण आपले सर्व नाभिक बांधव हे संवेदनशील आहेत अशी आमची कायमच भावना राहिलेली आहे.
म्हणून आणि म्हणूनच आपण सर्वजण दिनांक २८ जानेवारी २०१९ रोजी सोमवारी बरोबर सकाळी १०.४५ वाजता भराडीमातेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सिंधुदुर्गाच्या कानाकोपऱ्यातून देवीला साकडे घालण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहणार आहोत.
प्रत्येक तालुक्यातील तमाम पदाधिकारी व सर्वसामान्य नाभिक बांधव या ' नाभिक साकडे ' उपक्रमात सहभागी होतील याबद्दल १०० % खात्री आहे. तेथे कोणत्याही प्रकारचा समारंभपूर्वक कार्यक्रम होणार नसून फक्त देवीला गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम होणार आहे याची सर्व नाभिक बांधवांनी नोंद घ्यावी. तसेच तेथे कोणत्याही प्रकारची जेवणाची, नाश्त्याची, चहाची सोय संघटनेमार्फत करण्यात येणार नाही. प्रत्येकाने आपापली सोय आपणच करावयाची आहे. आपला मुख्य उद्देश देवीला साकडे घालणे हा असून आपल्या नाभिक समाजबांधवांवर कोणत्याही प्रकारचे अरिष्ट येऊ नये असा आहे. त्यासाठी मनोभावे एकाच वेळी सर्व जिल्हावासीय एकत्र येऊन देवीला मनोभावे आपले गाऱ्हाणे मांडून देवीचा आपल्यावर कायम वरदहस्त राहावा यासाठी साकडे घालूया.
हा उपक्रम फक्त अखिल नाभिक मानवजातीचे कल्याण व्हावे यासाठीच प्रेरित आहे. त्यामुळे सर्वांनी स्वेच्छेने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून साकडे पार पाडण्यासाठी एकदिलाने एकत्र यावे ही नम्र विनंती.
आपले विश्वासू ,
श्री. अनिल यशवंत अणावकर
जिल्हाध्यक्ष ,
सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक मंडळ ,
सिंधुदुर्ग .

No comments:
Post a Comment