सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक मंडळाचे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व काल काळाच्या पडद्याआड गेले. सिंधुदुर्ग नाभिक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत उर्फ चंदू ( चंदो ) चव्हाण यांनी काल सकाळी गोवा येथील शासकीय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
सर्व सिंधुदुर्ग नाभिक बांधवांना शोकसागरात लोटून एक नाभिकांचा अनभिषिक्त सम्राट कायमचा सोडून गेला. एक नाभिकांचा आधारवड काल निघून जाताना त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक बांधवांचा हजारोंचा जनसागर लोटला होता.
कुडाळ तालुका नाभिक मंडळाला लाभलेला एक हिरा. एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. काल त्यांनी दिलेली मृत्यूची झुंज अयशस्वी ठरली. नियतीने आपला डाव साधला. समस्त सिंधुदुर्ग नाभिक मंडळाचे नाक म्हटले तरी वावगे ठरणार नाही. असा देखणा, बोलका, बुद्धिमान, खंदा नाभिक कार्यकर्ता मृत्युशय्येवर पाहताना कित्येकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.
दोन दिवसांपूर्वी कुडाळ येथे समोरासमोर झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात चंद्रकांत चव्हाण सापडले. ती टक्कर इतकी भीषण होती कि त्यांच्या त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ कुडाळ नाभिक बांधवांनी खाजगी इस्पितळात दाखल केले. तेथे त्यांची तब्येत अधिक खालावली. त्यामुळे त्यांना गोवा येथील बांबुळी येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी अनेक शर्थीचे प्रयत्न केले. नाभिक बांधवांनी देवाला साकडे घातले कि आमच्या चंदुला वाचव रे बाबा ! चंदू सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला बोलायला जमत नव्हते. सर्व नाभिक बांधव त्याला धीर देत होते. तू लवकर बरा होशील असे त्याला सांगत होते. पण प्राक्तनाला हे मंजूर नव्हते कि काय ? शेवटी त्याला देवाज्ञा झाली. नाभिक संघटनेची एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. कसे घडले हे अचानक ? भास म्हणावा कि स्वप्न ? काहीच समजत नाही ! पण अत्यंत वाईट घटना घडलेली आहे. जो आवडतो सर्वाला ...तोची आवडे देवाला असेच काहीसे घडले. अजूनही खरे वाटत नाही. हे एक वाईट स्वप्न असावे आणि आमचा चंदू धावत धावत आमच्यात यावा असे एखाद्या क्षणी वाटून जाते आणि हृदयाचा ठोकाच चुकतो. अशा या थोर नाभिक नेत्याला आमचे कोटीकोटी प्रणाम ....त्याने केलेल्या कर्तृत्वाला आमचा सलाम....असा नाभिकसम्राट आता होणे नाही. हुरहूर लावून गेलेल्या आमच्या या नाभिक सम्राटास चिरशांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना आणि त्यांनी नाभिक संघटनेची जी स्वप्ने उराशी बाळगली होती ती पूर्ण केली तरच त्यांना अखेरची शांती लाभेल, यासाठी आता कंबर कसून नाभिक संघटनेने कामाला लागले पाहिजे ही त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल.

No comments:
Post a Comment