Monday, August 19, 2024

नाभिक सहविचार सभा : दिनांक १९ ऑगस्ट २०२४

          सोमवार दिनांक १९ ऑगस्ट २०२४ रोजी कणकवली तालुका नाभिक संघटनेची सहविचार सभा मा. अनिलजी अणावकर यांच्या निवासस्थानी अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली. त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते संत सेना महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

          सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे माजी उपाध्यक्ष कै. अशितोष कुबल यांना संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण व माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी शोकपर मनोगत व्यक्त केले. 

          तालुका सरचिटणीस प्रवीण कुबल यांनी सर्वांचे शाब्दिक स्वागत केले. नाभिक पदाधिकारी यांनी एकमेकांना नाभिक बंधनाची राखी बांधली. प्रवीण कुबल यांनी मागील सभेचे इतिवृत्त व खर्चाचा तपशीलवार हिशेब सांगितला. मागील संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीपासून झालेल्या सर्व खर्चाचा तपशील सांगण्यात आला. झालेल्या खर्चाला मंजुरी घेण्यात आली. 

🔸 संत सेना महाराजांची पुण्यतिथी शुक्रवारी ३० ऑगस्ट रोजी संपन्न होणार असल्याने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. सकाळी ८ वाजता पूजन, आरती, भजन होणार आहे. त्यानंतर अल्पोपहार वितरित होणार आहे. सर्वांनी त्यानंतर सभासद नोंदणी करावयाची आहे. उपस्थितीपत्रकावर आठवणीने सही करायची आहे. संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी 

🔸वर्गणी : गेल्यावर्षीप्रमाणे ५०० रुपये वर्गणी द्यावयाची आहे. 

          संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. 

🔸संत सेना महाराज चित्र स्पर्धा आयोजित केली असून ६ ते १० वर्षातील मुले बालगटात, ११ ते १४ वर्षातील मुले किशोरगटात, १५ ते पुढील मुले खुल्या गटात सहभागी होऊ शकणार आहेत. चित्र स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी A 4  साईज कागदावर चित्र काढून रंगवून जमा करावयाचे आहे. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे. 

🔸संत सेना महाराज वेशभूषा स्पर्धा आयोजित केली असून यामध्ये फक्त ६ वर्षाखालील मुले, मुली सहभागी होऊ शकणार आहेत. ३० ऑगस्ट रोजी पुण्यतिथीच्या दिवशी रंगमंचावर ही मुले संत सेना महाराजांच्या वेशभूषेचे सादरीकरण करणार आहेत. वेशभूषेचा खर्च स्वतः करावयाचा आहे. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे. 

🔸रांगोळी स्पर्धा आयोजित केली असून यामध्ये फक्त महिला सहभागी होऊ शकणार आहेत. प्रत्येक स्पर्धकाने रांगोळी स्वतः आणावयाची आहे. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी बाळ गोपाळ हनुमान मंदिर ( भालचंद्र भक्त निवास समोर ) येथे मा. अनिल अणावकर यांनी ठरवून दिलेल्या जागेत चौरसात आखून दिलेल्या भागात रांगोळी काढायची आहे. परीक्षक म्हणून श्री. तुळशीदास कुबलसर यांनी काम पाहायचे आहे. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे. 

▪️ वरील सर्व प्रकारच्या कोणत्याही स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे तालुका सरचिटणीस प्रवीण कुबलसर ( 9881471684) यांचेकडे आठ दिवसांच्या आत द्यावयाची आहेत. नंतर आलेल्या स्पर्धकांचा विचार केला जाणार नाही. 

🔸 दानशूर श्री. संकेत श्रीधर नाईक यांचे आभार : सन्माननीय प्रसिद्ध अभियंता श्री. संकेत श्रीधर नाईक यांनी यापूर्वीही नाभिक मुलींना आर्थिक सहाय्य दिले होते. यंदाही आपल्या स्पर्धेची सर्व ट्रॉफी सन्मानचिन्हे त्यांच्या सढळ दातृत्वातून मिळत आहेत. त्याबद्दल त्यांचे संघटनेच्या वतीने आभारी आहोत. 

🔸१० वी, १२ वी उत्तीर्णांचा सत्कार समारंभ नियोजित असून कणकवली, तळेरे, खारेपाटण, नांदगाव, फोंडा, कनेडी आणि संपूर्ण कणकवली तालुक्यातील नाभिक बांधवांनी आपल्या मुलांची गुणपत्रके झेरॉक्स प्रवीण कुबल सरांकडे आठ दिवसात जमा करावयाची आहेत. त्यानंतर येणाऱ्या नावांचा विचार केला जाणार नाही. उत्तीर्ण झालेल्या मुलांना संघटनेच्या वतीने भेटवस्तू, सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन समारंभपूर्वक सन्मानित केले जाणार आहे. आजच्या मिटिंगमध्ये १४ नावे आलेली आहेत. कृपया नावे लवकर द्यावीत. 

🔸 आदर्श नाभिक बांधव पुरस्कार विभागवार देणे नियोजित असून कणकवली तालुक्यातील कणकवली शहर, कणकवली विभाग, तळेरे विभाग, नांदगाव विभाग, खारेपाटण विभाग, फोंडा विभाग, कनेडी विभाग या सर्व विभागातून सर्वानुमते निवड केलेल्या नाभिकाला आदर्श पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तरी सर्व विभागीय अध्यक्ष यांनी दोन दिवसात आपल्या विभागातील नाव द्यावयाचे आहे. 

🔸 अन्नपूर्णा निधी योजना राबविण्यात येत असून ज्यांना पुण्यतिथी दिवशी अन्नदान करण्याची इच्छा असेल त्यांनी स्वेच्छा निधी द्यायचा आहे. तो पाचशेच्या पटीत असेल. सभेमध्ये संतोष चव्हाण ( दुध व्यापारी ) कलमठ यांनी २००० रुपये, ईश्वरी प्रवीण कुबल यांनी २००० रुपये, सुनिल चव्हाण ( फोंडा माजी अध्यक्ष ) ५०० रुपये, अनंत चव्हाण ( खारेपाटण माजी अध्यक्ष ) ५०० रुपये आणि संतोष चव्हाण ( खारेपाटण माजी अध्यक्ष ) ५०० रुपये जाहीर केले आहेत. काहींनी लगेच जमा केले आहेत. सर्व दानशूर व्यक्तींचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करीत आहोत. 

🔸 पुण्यतिथीच्या दिवशी स्नेहभोजन कार्यक्रम नियोजित असून सर्व उपस्थितांना स्नेहभोजनाचा प्रतिवर्षीप्रमाणे लाभ मिळणार आहे. कृपया सर्व नाभिक बंधु भगिनी यांनी सर्वांना सांगून लाभ घ्यायचा आहे. अन्नपूर्णा निधी योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी कुबल सरांशी फोन संपर्क करावयाचा आहे. भोजन बुफे पद्धतीने होणार आहे. नेहमीच्या पदाधिकारी मंडळींनी भोजन वाढण्यासाठी नियोजनबद्ध संयोजन करावयाचे आहे. 

🔸 ३१ ऑगस्ट २०२४ : रोजी जिल्हा ब्युटीपार्लर सेमिनार आयोजित केलेला असून कणकवली तालुक्यातून ३० जणांचा सहभाग असणं ही कणकवली तालुक्यासाठी अभिमानाची बाब असणार आहे. यात अनिल अणावकर, चंद्रशेखर चव्हाण, मनोज चव्हाण, निलेश चव्हाण, संजय कुबल यांनी नावे नोंदविली आहेत. हा सेमिनार कुडाळ तालुक्यातील पावशीमधील ' शांतादुर्गा हॉल ' येथे संपन्न होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत सेमिनार चालणार असून उपस्थितांना त्याबद्दलचे प्रमाणपत्र मिळणार आहे ज्याचा उपयोग त्यांना भविष्यात होऊ शकतो. प्रवेश शुल्क ५०० रुपये असून ज्यांना सेमिनार अटेंड करायचा असेल त्यांनी आपली नावे चंद्रशेखर चव्हाण ( जिल्हा कार्याध्यक्ष ) 9890291224 यांच्याकडे वेळीच द्यायची आहेत. 

🔸 जय भवानी ग्रुपचे हार्दिक त्रिवार आभार :  दशावतारी नाटकाचा जमाखर्च : संत सेना महाराजांच्या जीवनावरील ' नाभिक पुराण ' हे नाटक कणकवली तालुक्याने संपन्न केले होते. त्यावेळी २६२९३ रुपये इतका खर्च जास्त आला होता. हा जास्त झालेला खर्च ' जय भवानी ग्रुप ' च्या वतीने करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याबद्दल कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने जय भवानी ग्रुपचे त्रिवार आभार मानण्यात आले. 

🔸व्यापारी संघ कणकवलीचे आजीवन सदस्य व्हा : कणकवली तालुका नाभिक संघटनेला ' व्यापारी संघ कणकवली ' यांनी नेहमीच आदर दिलेला आहे. ही संघटना कणकवलीतील मोठी संघटना आहे. या संघटनेचा आजीवन सदस्य असणे ही प्रतिष्ठेची  गोष्ट मानली जाते. नाभिक बांधवांनीही या मोठ्या संघटनेचे सदस्य होण्यासाठी आवाहन करण्यात आले. फॉर्म उपलब्ध असून प्रवीण कुबलसर यांच्याकडे ते मागून घेऊ शकतात. किमान १० सदस्य असावेत अशी अपेक्षा आहे. 

🔸 नाभिक विकास आराखडा : बाबत माजी सरचिटणीस विलास चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली. त्यामुळे पुढील सभेमध्ये अजिंड्यामध्ये तसा विषय घेण्याबाबत सुचना मांडली. 

🔸 गाव तेथे नाभिक संकल्पना यादी : बाबत नाभिक सदस्यांनी विषयाची मांडणी केली. त्यात प्रत्येक गावात नाभिकाला मिळत असलेला मान यावर चर्चा झाली.

🔸अभिनंदन : खारेपाटण नवनियुक्त अध्यक्ष मा. मनोहर अनंत चव्हाण यांचे संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

🔸आभार : उपस्थित सर्व मान्यवरांचे सरचिटणीस यांनी हार्दिक आभार मानले. सभेला ५० पेक्षा जास्त सदस्य, सदस्या उपस्थित होते. 

©️ प्रवीण कुबलसर, तालुका सरचिटणीस, कणकवली तालुका नाभिक संघटना 




















































 

No comments:

Post a Comment

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...