Saturday, August 10, 2019

कणकवली तालुका नाभिक मंडळाची सहविचार सभा संपन्न

नाभिक समाजाने आपली संघटना मजबूत करावी  - जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांचे प्रतिपादन
कणकवली : दिनांक १० ऑगस्ट २०१९ : महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ, मुंबई संलग्न कणकवली शाखेची सहविचार सभा नुकतीच अनिल अणावकर त्यांच्या निवासस्थानी संपन्न झाली त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी उपस्थित कणकवली तालुका नाभिक बांधवांना संबोधित केले.
          ते म्हणाले, नाभिक बांधवांनी आपली संघटना मजबूत केली पाहिजे, आपले परस्पर हेवेदावे विसरून आपल्या बांधवांमध्ये जिव्हाळ्याचे वातावरण निर्माण केले पाहिजे. सचिव प्रवीण कुबल यांनी सभेतील सर्व विषय मांडले. सदर  विषयांवर विचार विनिमय व चर्चा करून निर्णय घेण्यात आले. २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाला म्हणजेच भव्य नाभिक मेळाव्याला शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले. त्यावेळी तालुक्यातील ६० पेक्षा जास्त नाभिक बांधव उपस्थित होते.
          २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मेळाव्यात विविध परीक्षांमध्ये  यशस्वी झालेल्या नाभिक विद्यार्थ्यांना  समारंभपूर्वक सन्मानित करण्यात येणार आहे. आदर्श नाभिक कार्यकर्ता, कणकवली नाभिक रत्न पुरस्कार देऊन नाभिक बांधवांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे कनेडी , फोंडा, खारेपाटण, तरेळे , नांदगाव, कणकवली विभागातील सर्व १० वी , १२ वी , १५ वी , पदव्युत्तर , खेळाडू,  नवीन नोकरीस लागलेले नाभिक मुले, मुली यांनी आपली गुणपत्रकाची झेरॉक्स ९८८१४७१६८४ या नंबरवर पाठवावी. किंवा विभागीय अध्यक्ष यांच्याकडे १७ ऑगस्ट पर्यंत जमा करावी.
          महिला ब्युटिशियन , ज्येष्ठ नाभिक कारागीर, ज्येष्ठ नाभिक यांचादेखील सत्कार केला जाणार असल्याने त्यांनी आपली माहिती वेळीच संघटनेकडे द्यावी. सर्व मुलांना, मुलींना , महिलांना व पुरुष कलाकारांना सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची संधी याद्वारे उपलब्ध केली असून ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांनी तालुका सचिव प्रवीण कुबल यांच्याशी संपर्क साधावा.
          संत सेना महाराजांची पुण्यतिथी सकाळी मूर्तिपूजन करून साजरी केली जाईल. सकाळी ९ वाजता सर्व विभागीय अध्यक्ष पूजन करतील. १० वाजता समारंभपूर्वक सत्कार समारंभ होईल. परमहंस भालचंद्र संस्थानातील भक्तनिवासाच्या  तळमजल्यावर कार्यक्रम संपन्न होईल. ठिक  ११.३० वाजता दशावतारी नाटकाचा प्रयोग होईल. त्यानंतर महाप्रसाद दिला जाईल. भोजनानंतर उपस्थित नाभिक बांधवांचा , भगिनींचा  सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल. तरी या भव्य नाभिक मेळाव्यामध्ये कणकवली तालुक्यातील तमाम नाभिक बांधवांनीं सहभागी व्हावे, असे नम्र आवाहन तालुक्याचे अध्यक्ष लक्ष्मीकांत चव्हाण यांनी केले आहे. कनेडी विभागाचे नूतन अध्यक्ष म्हणून नंदू चव्हाण यांची निवड करण्यात आली.
         




No comments:

Post a Comment

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...