१७ ऑगस्टला होणार कणकवली नाभिक महिलांची सभा
कणकवली : दिनांक १० ऑगस्ट २०१९ : सेना महाराजांची पुण्यतिथी कणकवली तालुका नाभिक मंडळाच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरी केली जाणार आहे. यंदा २७ ऑगस्ट रोजी संत सेना महाराजांची पुण्यतिथी येत असल्याने त्यादिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात नियोजन करण्याच्या उद्देशाने १७ ऑगस्ट रोजी कणकवली तालुका महिला नाभिक मंडळाची महिला सभा अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी भालचंद्र नगर येथे दुपारनंतर ठिक २. ३० वाजता संपन्न होणार आहे. तरी सर्व कणकवली तालुक्यातील नाभिक महिलांना नम्र विनंती करण्यात येत आहे कि, सर्व ब्युटीपार्लरधारक , गृहिणी, विद्यार्थिनी , नाभिक कर्मचारी यांनी सभेला उपस्थित राहावे. सर्व कनेडी ,फोंडा,नांदगाव, तरेळे ,खारेपाटण विभागीय नाभिक महिला यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली तालुका महिला नाभिक मंडळाच्या सचिव हेमांगी अणावकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment