Saturday, August 5, 2023

🛑 निलीमा सुधाकर चव्हाण हिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल जाहीर निषेध

 🛑 निलीमा सुधाकर चव्हाण हिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल जाहीर निषेध

🔵 कणकवली तालुका नाभिक संघटनेकडून पोलीस निरिक्षक यांना निवेदन 

कणकवली : 

          नुकत्याच चिपळूण येथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी व कणकवली पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यासाठी संपूर्ण कणकवली तालुका नाभिक संघटना एकत्र आली होती. त्यावेळी २४ वर्षीय नाभिक युवती निलीमा सुधाकर चव्हाण हिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल सर्व कणकवली नाभिकांनी अज्ञात समाजकंटकांविरोधात जाहिर निषेध व्यक्त केला. 

          दापोलीवरुन आपल्या गावी येत असताना अचानक बेपत्ता झालेल्या निलीमा चव्हाण हिचा मृतदेह दाभोळ येथील खाडीत सापडल्याने रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग यांनी तपास यंत्रणेने लवकरात लवकर तपास करुन दोषींना कठोर शासन करावे व अन्यायग्रस्त पालकांना न्याय मिळवून द्यावा यासाठी कणकवली पोलीस ठाणे येथे कणकवली तालुका पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले. 

          त्यावेळी कणकवली तालुका पोलीस निरिक्षक यांनी निवेदन घेत याची पुढील चौकशी करण्यासाठी तातडीने नाभिक महिलांचे निवेदन पुढे पाठवत असल्याचे आश्वासन दिले. त्यावेळी माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण , कणकवली तालुकाध्यक्ष रोशन चव्हाण , कणकवली महिला तालुकाध्यक्षा तेजस्विनी कुबल , कणकवली युवा तालुकाध्यक्ष रुपेश चव्हाण , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पत्रकार गणेश चव्हाण , , दिगंबर चव्हाण , सुभाष चव्हाण , अनंत चव्हाण , महिला सचिव आरती चव्हाण , कणकवली उपाध्यक्ष निलेश चव्हाण , कणकवली कार्याध्यक्ष संजय कुबल , कणकवली शहराध्यक्ष अनिल शिंदे , जिल्हा खजिनदार शिवानी चव्हाण , अस्मिता अणावकर , ज्योती टिपुगडे , चंदा चव्हाण , मैथिली चव्हाण संजय चव्हाण , शरद लाड , प्रणय चव्हाण आणि ४० पेक्षा अधिक नाभिक  उपस्थित होते. सर्वांनी अत्याचारित निलीमा सुधाकर चव्हाण हिला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.










No comments:

Post a Comment

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...