🌀 नाभिकांनी एकत्र येऊन नेत्रदिपक कार्य घडवुया : तालुकाध्यक्ष रोशन चव्हाण
🧿 कणकवली तालुका नाभिक संघटनेची सहविचार सभा उत्साहात संपन्न
कणकवली : दिनांक २२ जुलै २०२३ :
“ नाभिक बांधवांनो , तुमची सर्वांची एकजूट बघून मी भारावून गेलो आहे. प्रत्येकानं जर आपल्या विभागात नाभिक समाजासाठी जागरूकपणे कार्य केले तर नाभिक समाजाचा विकास कोणीही थांबवू शकत नाही. त्यासाठी विभागात ज्यावेळी आवश्यकता असेल तेव्हा आम्ही तुमच्याकडे येऊ. नाभिक बांधवांनी गणना फॉर्म वेळीच भरुन द्यावेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी होणाऱ्या श्रावण सहलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन संघटनेने केलेले आहे. आपण सर्व नाभिकांनी एकत्र येऊन नेत्रदिपक कार्य घडवूया , ” असे प्रतिपादन कणकवली नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष रोशन चव्हाण यांनी तालुका संघटनेच्या सहविचार सभेत अध्यक्षपदावरुन बोलताना केले.
संत सेना महाराजांच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर नाभिक व नाभिकेतर समाजातील देहावसान झालेल्या बांधवांसाठी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जिल्हा पदाधिकारी आणि तालुका पदाधिकारी यांचे ‘ रामरक्षा स्तोत्र ‘ पुस्तिकेची भेट देऊन यथोचित स्वागत करण्यात आले. मागील इतिवृत्ताचे वाचन करुन त्यावर सर्वानुमते मंजुरी घेण्यात आली. मागील खर्चास मंजुरी घेण्यात आली. ११ सप्टेंबर रोजी होणाऱ्या संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीविषयी तालुकास्तरीय नियोजन करण्यात आले. सत्कार करावयाच्या आदर्श नाभिक कार्यकर्ता व कार्यकर्ती म्हणून नाभिकांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दहावी , बारावी उत्तीर्ण झालेल्या नाभिक मुलामुलींची यादी तयार करण्यात आली.
श्रावण महिन्यामध्ये ज्येष्ठ नाभिक बंधुभगिनींची कुणकेश्वर तीर्थक्षेत्र सहल नियोजित करण्यात आली. त्यासाठी पुढे येणाऱ्या प्रायोजकांना आवाहन करण्यात आले. नाभिक समाजाचे संत शिरोमणी संत सेना महाराज व नाभिक पुराण यांचा अभ्यास करुन नाभिक दशावतारी कलाकारांना एकत्र आणून नाटक बनविण्याचा संकल्प करण्यात आला. यासाठी अनंत चव्हाण ( करंजे ) यांची समन्वयक म्हणून निवड करण्यात आली. या नाटकामध्ये सहभागी होणाऱ्या हुमरस , दोडामार्ग , आवेरी, वजराट , आरोंदा , तेंडोली , वेंगुर्ले , मालवण येथील नाभिक दशावतारी कलाकारांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला.
तालुका नाभिक संघटनेसाठी नवीन पदांवर नियुक्ती दिलेल्या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. त्यावेळी निवड झालेले नाभिक बंधु भगिनी पुढीलप्रमाणे : कणकवली तालुका युवा अध्यक्ष रुपेश भास्कर चव्हाण ( फोंडा ) , कणकवली तालुका महिला सचिव आरती आनंद चव्हाण , कणकवली शहर युवा अध्यक्ष संजय मधुकर चव्हाण ( कसालकर ) , खारेपाटण विभागीय अध्यक्ष संतोष गणपत चव्हाण , फोंडा विभागीय अध्यक्ष दत्ताराम अरविंद चव्हाण , फोंडा युवा अध्यक्ष प्रशांत दिपक चव्हाण , फोंडा विभागीय सचिव महेश परब , फोंडा महिला विभागीय अध्यक्षा मनिषा रुपेश चव्हाण , खारेपाटण महिला विभागीय अध्यक्षा रश्मी राजेंद्र चव्हाण , जिल्हा सदस्या साक्षी प्रकाश चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नूतन निर्वाचित पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण , जिल्हा महिला खजिनदार शिवानी चव्हाण , कणकवली उपाध्यक्ष निलेश चव्हाण , कार्याध्यक्ष संजय कुबल , कणकवली शहर अध्यक्ष अनिल शिंदे , तालुकाध्यक्षा तेजस्विनी कुबल , कार्याध्यक्षा प्रिया चव्हाण , तालुका खजिनदार मनोज चव्हाण , जिल्हा सदस्य प्रवीण चव्हाण , गुरुदास चव्हाण , रामदास चव्हाण , शरद लाड , रचना चव्हाण , तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रणय चव्हाण , खारेपाटण माजी अध्यक्ष अनंत चव्हाण , फोंडा माजी अध्यक्ष सुनिल चव्हाण , कनेडी अध्यक्ष प्रशांत चव्हाण , नांदगाव अध्यक्ष श्रीकांत टाकळे, महिला सहसचिव ईश्वरी कुबल आणि ७० पेक्षा जास्त नाभिक उपस्थित होते.
माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , माजी सचिव विलास चव्हाण , उपाध्यक्ष निलेश चव्हाण , कार्याध्यक्षा प्रिया चव्हाण , जिल्हा सदस्य रामदास चव्हाण , कोषाध्यक्षा अभिलाषा शिंदे आणि सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तालुका सरचिटणीस प्रवीण कुबल यांनी संपूर्ण सभेचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.




































































































No comments:
Post a Comment