🔴 कणकवली तालुका नाभिक संघटना ( महिला सभा )
कळवण्यात येते की सोमवार दिनांक 18 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारनंतर ठिक तीन वाजता जिल्हाध्यक्ष मा.अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी कणकवली तालुका महिला नाभिक संघटनेची विशेष सहविचार सभा घेण्यात येत आहे तरी सर्व महिलांनी सभेला वेळीच उपस्थित राहून सहकार्य करावे ही विनंती.
🌐 सभेपुढील विषय
1️⃣ मागील सभेचे इतिवृत्त वाचन व मंजुरी
2️⃣ बचत गट स्थापन करणे बाबत
3️⃣ महिलांना पुरस्कार देणेबाबत
4️⃣ सभासद फी गोळा करणे बाबत
5️⃣ तालुका महिला सल्लागार निवड करणे
6️⃣ तालुका अध्यक्षा यांच्या परवानगीने येणारे विषय
7️⃣ आयत्या वेळचे विषय
©️ सहसचिव / सचिव
🟨 कु.हेमांगी अनिल अणावकर
कणकवली महिला नाभिक संघटना
🟦 सचिव किंवा सहसचिव उपस्थित नसल्यास तालुकाध्यक्षा किंवा कार्याध्यक्षा यांची सभा परिपूर्ण करण्याची जबाबदारी राहील.
🟪 सचिव ईश्वरी कुबल यांनी स्वेच्छेने सचिव म्हणून पूर्ण जबाबदारी कु. हेमांगी अनिल अणावकर यांच्याकडे दिली असून त्या स्वतः सहसचिव म्हणून यापुढे जबाबदारी स्वीकारतील.
©️ सचिव , कणकवली तालुका नाभिक संघटना
No comments:
Post a Comment