कोरोना विषाणू संसर्गजन्य असल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर शाळा, सिनेमागृहे, आठवडा बाजार आणि इतर कार्यालयांमधील सामाजिक कार्यक्रम यांच्यावर सध्या शासनाने आपत्कालीन कायदा लागू केला आहे. याची झळ नाभिक व्यावसायिकांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आपल्या गिऱ्हाईकांना चांगली सेवा देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे आणि आपण ते पार पाडत आहात याबद्दल शंका घेण्याचे मुळीच कारण नाही. पण दुसऱ्यांची सेवा करताना आता आपल्या नाभिक व्यावसायिक बांधवांच्या जीवावर सर्वात मोठे संकट येऊन ठेपले आहे.
गिऱ्हाईकांना सेवा देणे हे आपले पहिले काम असले तरी आपल्या सेवेवर आपले मायबाप गिऱ्हाईके १०० % जो विश्वास दाखवतात त्याला तडा जाणार नाही याचीही आपण आता अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्या सलून व्यावसायिकाला जीवावर उदार होऊन सेवा देत असताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे.
त्यावर चर्चा विनिमय करण्यासाठी कणकवली तालुका नाभिक संघटनेची तातडीची सभा उद्या बुधवार दिनांक १८ मार्च रोजी दुपारी ठिक २. ३० वाजता अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी आयोजित केली आहे. तरी सर्व नाभिक बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवून सभेला वेळीच उपस्थित राहावे ही कळकळीची विनंती आहे.
तरी सदर मेसेज आपणांस प्राप्त झाल्यानंतर ज्यांच्याकडे whats app नसेल असे आपणास माहित असेल त्यांना विभागीय अध्यक्ष, सचिव, केंद्र संघटक यांनी हस्ते परहस्ते निरोप पोहोच करावा ही विनंती आहे.
आपण सर्व आपल्या संघटनेचे पाईक आहात, आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबवून ते लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. ते पोहोचवण्यासाठी तुमची सर्वांची मोलाची साथ लाभल्यामुळेच हे शक्य झाले आहे.
यावेळी आपले कस्टमर आणि आपण दोघेही गोंधळलेल्या मनस्थितीमधून जात आहोत. नक्की काय करावे हे समजेनासे झाले आहे. पण काळजी करण्यापेक्षा काळजी घेतलेली बरी , या सूत्रानुसार आपल्याला काम करावे लागणार आहे. तरी आपण याल अशी आशा बाळगतो.
आपला सचिव ( कुबलसर ) ..... कणकवली तालुका नाभिक संघटना
( अधिकची सूचना : आपल्या समाजातील ब्युटीपार्लरचा व्यवसाय करणाऱ्या महिलांनीदेखील सभेला उपस्थित राहण्यास हरकत नाही. )

No comments:
Post a Comment