Sunday, December 2, 2018

दिनांक ८ सप्टेंबर १८ च्या नाभिक सहविचार सभेचा AGENDA

कणकवली तालुका नाभिक मंडळ सहविचार सभा  जावक क्र. २/ २.१२.२०१८
सर्व कणकवली तालुका नाभिक बंधू, सलून मालक, सलून चालक, कारागीर, कर्मचारी वर्ग आणि ज्ञातिबांधव यांसी,
सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
     शनिवार दिनांक ८ डिसेंबर २०१८ रोजी ठीक २.३० वाजता कणकवली तालुका नाभिक मंडळाची सभा अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी आयोजित केली आहे. अर्ध्या तासात सभा सुरु होईल.
सभेपुढील विषय :

  1. श्रद्धांजली 
  2. स्वागत व प्रतिमापूजन
  3. मागील सभेचे इतिवृत्त
  4. मागील झालेल्या खर्चास मंजुरी
  5. ओळखपत्र, ड्रेसकोड, नाभिक भवन चर्चा व पाठपुरावा
  6. भालचंद्र महाराज पुण्यतिथी उत्सव स्वच्छता अभियान नियोजन
  7. कणकवली नाभिक पायी वारीचे नियोजन व वर्गणी
  8. वाढदिवसाच्या शुभेच्छा 
  9. आयत्या वेळचे विषय 
  10. आभार प्रदर्शन

वरील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा विचार विनिमय होणार आहे. तरी कणकवली तालुक्यातील सर्व नाभिक ज्ञातिबांधव यांनी उपस्थित राहावे हि नम्र विनंती.
     सभा कालावधीत दुकाने बंद ठेवून आपल्या सभेला शेकडोंच्या संख्येने
हजर राहा. सलूनमालकांनी आपल्या कारागिरांना देखील सदर सभेस उपस्थित राहण्याचे आहे असे सांगावे. कारण आपली संघटना सर्व नाभिकांसाठी आहे आणि नाभिक असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे . धन्यवाद.
                   आपले नम्र,
अध्यक्ष, कणकवली तालुका नाभिक मंडळ , कणकवली.

1 comment:

  1. १) कणकवली शहरासाठी सदर अजिंडा पत्रे संख्या ७० एवढी शहर सदस्य श्री.चंद्रशेखर चव्हाण यांच्याकडे दिली आहेत. विभागीय शहर संघटक यांनी कृपया त्यांच्याकडून पत्रके प्राप्त करून वेळीच सर्व शहर सदस्यांना, नाभिक बांधवांना रीतसर कळवावे हि विनंती.
    २ ) येताना आपल्या विभागातील नाभिक समाजातील गरीब होतकरू व माध्यमिक शिक्षण सुरु असलेल्या मुलीची माहिती घेऊन येणे. तिच्या आधारकार्ड ची झेरॉक्स, तिचा सध्याचा फोटो इ. माहिती आठवणीने घेऊन यावी. अशा मुलींचे प्रस्ताव करून त्यांना मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने सदर माहिती घेऊन यावी.
    ३ ) ज्यांना ओलाख्पात्रासाठीचे forms मिळाले आहेत त्यांनी ते पूर्ण भरून फोटो व २५ रु. सह जमा करावेत म्हणजे १ जानेवारी पर्यंत आपल्याला आपल्या समाजाची ओळखपत्रे मिळण्यास सोपे होईल.
    ४ ) ज्यांना ओळखपत्रे forms मिळालेले नाहीत त्यांनी ते संघटनेकडून मागून घ्यावेत.
    ५ ) ज्यांनी ड्रेसकोड सुरु केलेला नाही, त्यांनी कृपया लवकरात लवकर ड्रेसकोड सुरु करून आपल्या संघटनेची ताकद व एकता दाखवून द्यावी.
    ६ ) सलून मालक व सलून कारागीर या सर्वांनी आपल्या स्वतःच्या संघटनेसाठी एक दिवस देवून सभेला उपस्थित राहून महत्त्वाचे योगदान द्यावे.
    ७ ) सलुनात काम करणारा कारागीर हा संघटनेसाठी अत्यंत महत्त्वाचा असून प्रत्येक कारागिराने अभिमानाने आपल्यासोबत इतर कारागिरांनाही सोबत घेवून यावे.
    ८) इतर ठिकाणी नोकरी व्यवसाय करणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या ज्ञातिबांधवांनी या सभेला उपस्थित राहावे व आपल्या संघटनेसाठी मोलाचे कार्य करण्यासाठी खारीचा वाटा उचलावा.
    ९ ) प्रत्येक विभागीय अध्यक्ष व सचिव यांची जबाबदारी आहे की त्यांनी आपापल्या विभागातील जास्तीत जास्त नाभिक उपस्थित राहण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.
    १० ) सभा कालावधीत दुकाने कंपलसरी बंदच ठेवावीत.
    ११ ) फक्त दुकाने बंद ठेऊन उपयोगाचे नाही तर सर्वांनी सभेला आठवणीने हजर राहावे.
    १२ ) सलूनमध्ये काम करणाऱ्या सर्व कारागिरांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी सभेला आवर्जून उपस्थित राहावे यासाठी आग्रही विनंती आहे. धन्यवाद.

    ReplyDelete

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...