Wednesday, October 31, 2018

कणकवली नाभिक रत्न सोहळा संपन्न कणकवली दिनांक : ७ सप्टेंबर २०१८ --कणकवली तालुका नाभिक मंडळाच्या वतीने शुक्रवारी भालचंद्र महाराज संस्थान भक्तनिवासात संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कणकवली नगर पंचायतीचे नगराध्यक्ष मा. समीरजी नलावडेसाहेब व मा. संदीप मेस्त्री हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. शोभराज शेर्लेकरसाहेब , शिक्षण विस्ताराधिकारी यांना नगराध्यक्ष यांच्या हस्ते ‘ नाभिक रत्न ‘ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे मा. शरद पुंडलिक लाड, नाभिक सदस्य यांनाही मा. संदीप मेस्त्री यांच्या हस्ते ‘ नाभिक रत्न' पुरस्कार देण्यात आला. समीरजी नलावडेसाहेब यांनी कणकवली नगरात ‘नाभिक समाज भवन’ होण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले. त्यानंतर ३० मुलांचा भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. महिला ब्युटीशियन यांनाही प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित सर्व ज्येष्ठ सलून कारागिरांचा सन्मान करण्यात आला. शासकीय कर्मचाऱ्यांचाही सन्मान केला गेला. १० नाभिकांचा समारंभपूर्वक केक कापून जाहीर वाढदिवस साजरा करण्यात आला. अनिल अणावकर, चंद्रशेखर चव्हाण, दशरथ चव्हाण, हेमांगी चव्हाण, प्रिया चव्हाण, शिवानी चव्हाण यांच्या हस्ते लहान मुलांना शैक्षणिक साहित्याची वाटप करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांना गुलाबपुष्प, श्रीफळ देऊन आदर व्यक्त करण्यात आला. कणकवली तालुका महिला नाभिक मंडळ स्थापन करण्यात आले. अध्यक्षा म्हणून मा. संजना संजय चव्हाण यांची बहुमताने निवड करण्यात आली. संजना चव्हाण यांचे मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. अनिल अणावकर , शोभराज शेर्लेकर, संजना चव्हाण यांनी आपली मनोगते व्यक्त केली. काही मुलांनी आपले सुप्त गुण दाखवून आपल्या कला सादर केल्या. महेश टिपुगडे याने शूर वीर जीवा काशीद या नाभिक व वीराबद्दल कथाकथन सादर केले. त्यानंतर संयुक्त दशावतारी नाट्यमंडळ यांच्या वतीने ‘ टाकलेली पोर ‘ हे नाटक सादर करण्यात आले. कार्यक्रमाला अनंत चव्हाण, समीर चव्हाण, श्रीकांत टाकळे, सुनील चव्हाण, चंद्रकांत चव्हाण हे विभागीय अध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व विभागांचे सचिव व कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री विठोबा चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विलास चव्हाण आणि सूत्रसंचालन श्री. कुबलसर यांनी केले.





























No comments:

Post a Comment

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...