🔴 कुडाळात भक्तीचा सागर: जिल्हाध्यक्ष रुपेश पिंगुळकर यांच्या घरी स्वामींच्या पालखीचे आगमन
कुडाळ: काल संत सेना महाराजांचा प्रकट दिन उत्साहात साजरा झाल्यानंतर आज कुडाळमध्ये एका विशेष आणि आनंददायी घटनेने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. रुपेश पिंगुळकर यांच्या घरी स्वामींच्या पालखीचे आगमन झाले.
पिंगुळकर यांनी स्वतः पालखी आपल्या घरी आणली, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता. ही बातमी कळताच कणकवली नाभिक संघटनेच्या सदस्यांमध्ये आनंदाची लाट पसरली. नितेश आणि रुपेश पिंगुळकर यांच्या घरी स्वामींचे आगमन होणे हा संघटनेतील प्रत्येकासाठी एक सुखद आणि गौरवाचा क्षण आहे, असे मत सदस्यांनी व्यक्त केले.
कणकवली नाभिक संघटनेचे तालुका सरचिटणीस प्रवीण कुबलसर यांनी या मंगल प्रसंगाबद्दल म्हणतात की, "काल संत सेना महाराजांचा प्रकट दिन आणि आज लगेचच पिंगुळकर यांच्या घरी स्वामी प्रकट झाल्याने आम्हा सर्वांना खूप आनंद झाला आहे. आमच्या संघटनेतील सर्व सदस्य सुखी आणि समाधानी राहावेत, यासाठी मी स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो."
या घटनेमुळे कणकवलीच्या नाभिक समाजात उत्साहाचे आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हाध्यक्ष रुपेश पिंगुळकर यांच्या घरी स्वामींच्या पालखीचे आगमन हा निश्चितच एक प्रेरणादायी आणि सकारात्मक अनुभव आहे.
No comments:
Post a Comment