🔴१८ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झालेली कणकवली तालुका नाभिक संघटनेचे इतिवृत्त
शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी कणकवली तालुका नाभिक संघटनेची तालुका कार्यकारिणी सहविचार सभा बहुसंख्य उपस्थितीत माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी अतिशय उत्साहात संपन्न झाली. त्यावेळी विषयपत्रिकेप्रमाणे सर्व विषय व्यवस्थित घेण्यात आले.
संत शिरोमणी सेना महाराजांच्या मूर्तीला मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सर्वांनी ‘ हे संत सेना , सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे , सर्वांना सुखात , आनंदात , ऐश्वर्यात ठेव , सर्वांचं भलं कर. कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. ’ ही प्रार्थना म्हटली.
सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेचे माजी पदाधिकारी व निवृत्त माध्यमिक शिक्षक बापू स. लाड यांच्या दुःखद निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्यात आले. तसेच ज्येष्ठ सदस्य सुभाष चव्हाण यांच्या पुत्राचे म्हणजेच गणपत चव्हाण यांचे दुर्दैवी अकाली निधन झाल्याबद्दल मनस्वी शोक व्यक्त करण्यात आला. सर्व नाभिकांनी एक मिनिटांची स्तब्धता पाळून मृतात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
तालुका सरचिटणीस प्रवीण कुबलसर यांनी सर्व पदाधिकारी व उपस्थित नाभिक सदस्यांचे गुलाबपुष्प देऊन यथोचित स्वागत केले. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी संपन्न झालेल्या सहविचार सभेचे इतिवृत्त वाचून सर्वानुमते कायम करण्यात आले. प्रत्येक गावातील नाभिक गावकरांची नावे कळविण्याबाबत पुन्हा सूचना मांडण्यात आली. त्यामुळे सर्वांनी आपल्या गावातील नावे देण्याबाबत सर्व विभागीय अध्यक्ष्यांनी किंवा परस्पर नावे सहखजिनदार श्री. राजेश चव्हाण यांच्याकडे यादीसाठी पाठविण्याबाबत ठरविण्यात आले.
प्रवीण कुबल यांनी संघटनेकडे सध्या बँकेत शिल्लक असलेली रक्कम सांगितली. तसेच सन्माननीय आमदार नितेशजी राणे साहेबांच्या माध्यमातून संघटनेच्या उपक्रमांसाठी मिळालेली रक्कम हाती ठेवण्याचे ठरविण्यात आले.
नवीन सलून दुकाने सुरु करण्यात आलेल्या सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
१ एप्रिल २०२५ पासून दरपत्रकात वाढ करण्याबाबतच्या विषयावर जोरदार चर्चा झाली. अखेर सर्वानुमते दर वाढवणे गरजेचे असल्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार नवीन ठरविलेले दर सांगण्यात आले. ज्यांना १ फेब्रुवारी पासून दर घ्यायचे असतील त्यांनी घ्यायला हरकत नसल्याचे ठरविण्यात आले. नवे दरपत्रक संघटनेकडून विकत घेऊन दुकानात लावण्याबद्दलचा ठराव मंजूर झाला. तसेच दर देखील दरपत्रकानुसारच घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
चर्चेत माजी अध्यक्ष बापू चव्हाण , माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , तालुकाध्यक्ष रोशन चव्हाण , उपाध्यक्ष निलेश चव्हाण , जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण , जिल्हा सदस्य रामदास चव्हाण , तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रणय चव्हाण , सरचिटणीस प्रवीण कुबल , संजय चव्हाण , नंदकिशोर चव्हाण , राजन चव्हाण , पांडुरंग साळोखे आणि बऱ्याच सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
पुढील काळात तालुका ब्युटीपार्लर सेमिनार घेण्याची गरज असल्यास घेतला जाईल असे ठरविण्यात आले. त्यासाठी कार्यकारिणी विशेष रीतीने एकत्र येऊन त्याबाबत निर्णय घेईल असे ठरविण्यात आले. त्यासाठी हेअर एक्सपर्ट प्रणय चव्हाण सारख्यांची मदत घेण्याबाबत ठरविण्यात आले. त्यापूर्वी ज्यांना प्रशिक्षणाची खरोखरच गरज असेल अशा युवा अप्रशिक्षित किंवा नवे तंत्रज्ञान शिकू इच्छिणाऱ्यांसाठी तालुका सेमिनारचे आयोजन करण्याचेही प्रस्तावित असेल असेही ठरविण्यात आले.
खारेपाटण माजी अध्यक्ष अनंत चव्हाण , त्यांचा मुलगा ओमकार चव्हाण यांनी केलेल्या सेवाकार्याबद्दल त्यांचा संघटनेच्या वतीने शाल , श्रीफळ व बुके देऊन सन्मान करण्यात आला. हर्बल हेल्थ कंपनीमध्ये ब्रँच मॅनेजर म्हणून बढती मिळाल्याबद्दल तालुका महिला सचिव आरती चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच संकेत धोंडू चव्हाण फोंडा गांगोवाडी यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या घरातील कोणीही उपस्थित नसल्याने पुढील कार्यक्रमाच्या त्यांचा सन्मान करण्यात येईल असे ठरले.
परमहंस भालचंद्र महाराज संस्थानात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये संघटनात्मक सहभाग न घेता स्वेच्छेने सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले.
८ मार्च २०२५ चा जागतिक महिला दिन साजरा करण्यासंदर्भात संपूर्ण जबाबदारी महिला संघटनेने पार पाडण्याविषयी चर्चा झाली. त्यावेळी उपस्थित महिलांनी निवडक महिलाच नेहमी येतात , न येणाऱ्या कधीच येत नाहीत , त्यांनीही यावे असे हृदय आवाहन केले. सर्व पुरुष सदस्यांना आपल्या घरातील महिलांना आणण्याविषयी आग्रहपूर्वक विनंती केली. महिला दिनाकरिता महिलांनी एकत्र बसून विचार करून कार्यक्रमाचे नियोजन केल्यास येणाऱ्या खर्चास संघटना पाठीशी असल्याचे सर्वानुमते सांगण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी प्रसंगानुरुप आणि विषयानुरुप भाषणे केली. त्याबद्दल वर उल्लेख केलेला आहेच. आयत्या वेळेच्या विषयात ‘ ट्रिप ‘ बाबत बोलले गेले. पण ट्रिप बाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. चहापान झाल्यानंतर आभार प्रदर्शन होऊन सभा संपल्याचे तालुका सरचिटणीस यांनी जाहीर केले.
तालुका सरचिटणीस , कणकवली तालुका नाभिक संघटना











No comments:
Post a Comment