Saturday, April 8, 2023

8 एप्रिल : नाभिक सहविचार सभा

🛑 कणकवली तालुका नाभिक संघटनेची मासिक सहविचार सभा उत्साहात संपन्न

कणकवली : दिनांक ८ एप्रिल २०२३ :

          कणकवली तालुका नाभिक संघटनेची मासिक सहविचार सभा नुकतीच माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. तालुकाध्यक्ष रोशन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.त्यावेळी व्यासपीठावर नाभिक नेते अनिल अणावकर , चंद्रशेखर चव्हाण , जिल्हा सल्लागार सुभाष चव्हाण , कार्याध्यक्ष संजय कुबल , उपाध्यक्ष निलेश चव्हाण , तालुका सल्लागार लक्ष्मीकांत चव्हाण , कणकवली शहराध्यक्ष अनिल शिंदे , फोंडा अध्यक्ष सुनिल चव्हाण , कनेडी अध्यक्ष प्रशांत चव्हाण , नांदगाव अध्यक्ष श्रीकांत टाकळे , खजिनदार मनोज चव्हाण , प्रसिद्धीप्रमुख प्रणय चव्हाण , महिला आघाडी उपाध्यक्षा रसिका आचरेकर , जिल्हा सदस्या रचना चव्हाण , महिला सहसचिव ईश्वरी कुबल , नाभिक नेत्या संजना चव्हाण इत्यादी उपस्थित होते. 

नाभिक व नाभिकेतर दिवंगत बांधवांना संघटनेच्या वतीने एक मिनिट स्तब्धता पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तालुका सरचिटणीस प्रवीण कुबल यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले. १८ मार्च रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून सर्वानुमते कायम करण्यात आले. झालेल्या खर्चास व पुढे होणाऱ्या खर्चास सर्वानुमते मंजुरी घेण्यात आली. खारेपाटण , तळेरे , नांदगाव , कणकवली , फोंडा , कनेडी आणि ओसरगाव या सर्व विभागातून कणकवली नाभिक संघटनेचे सर्वाधिक सदस्य झाल्याबद्दल सरचिटणीस यांनी सर्वांचे विशेष आभार व्यक्त केले. 

१७ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळ , जिल्हा शाखेच्या वतीने मालवण तालुक्यात साजरी करण्यात येणाऱ्या संत सेना महाराज जयंतीबद्दल अधिक माहिती देण्यात आली. सदर भव्य दिव्य सोहळ्याचे औचित्य साधून जिल्ह्यातील ४५ पेक्षा जास्त नाभिक बंधु भगिनींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृहामध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. सायंकाळी ५ वाजता कार्यक्रमांची सांगता होणार आहे. कणकवलीतील चंद्रशेखर सुरेश चव्हाण , सुभाष लक्ष्मण चव्हाण , चंद्रकांत भिकाजी चव्हाण , विठोबा नारायण चव्हाण , लक्ष्मीकांत सुर्यकांत चव्हाण , रचना राजन चव्हाण , समीर दिगंबर चव्हाण , रोशन मनोहर चव्हाण , दशरथ सुरेश चव्हाण , तेजस्विनी तुळशीदास कुबल , अनंत भिकाजी चव्हाण , संजना संजय चव्हाण इत्यादी सत्कारमूर्तींचा मान्यवरांच्या शुभहस्ते मानपत्र देऊन समारंभपूर्वक सत्कार करण्यात येणार आहे. तरी या सर्वांनी आपल्या कुटुंबासह कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी केले. 

कणकवली तालुक्यात तळेरे वाघाचीवाडी येथे कणकवली नाभिक भवन व्हायला हवे अशी सर्वानुमते इच्छा व्यक्त करण्यात आली. तळेरे अध्यक्ष समीर चव्हाण आणि तळेरे विभागातील नाभिक पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. 

नाभिक गणना फॉर्मचे वितरण करण्यात आले. गाव संघटक नेमण्यात आले. त्यांच्याकडे गणना करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. विभागाच्या अध्यक्ष्यांनी यात मुख्य भूमिका बजावण्याबाबत दुजोरा देण्यात आला. 

कणकवली शहरासाठी संपर्कप्रमुख तथा शहर संघटक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यात प्रकाश चव्हाण ( हुमरट ) , गणेश चव्हाण ( कलमठ लांजेवाडी ) , प्रवीण चव्हाण ( कलमठ ) , गुरुदास सत्यवान चव्हाण ( किर्लोस ) , वासुदेव चव्हाण ( कणकवली ) , गुरुदास मधुकर चव्हाण ( कसालकर ) यांच्या निवडीबद्दल माजी संपर्कप्रमुख संजय अनंत कुबल , निलेश पांडुरंग चव्हाण , चंद्रशेखर सुरेश चव्हाण , अनिल यशवंत अणावकर , महेश शिवराम चव्हाण , संजय मधुकर चव्हाण यांच्या शुभहस्ते स्वागत व अभिनंदन करण्यात आले. अनुपस्थित संपर्कप्रमुखाने आपले काम माजी संपर्कप्रमुखांकडून समजून घेण्याचे ठरविण्यात आले. 

सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेकडे कणकवली तालुक्यातून जाणाऱ्या जिल्हा सदस्यांची सर्वानुमते अभिनंदनीय निवड करण्यात आली. त्यात अनिल सहदेव शिंदे , रामदास धाकू चव्हाण , प्रवीण संतोष चव्हाण आणि शरद पुंडलिक लाड यांची निवड झाल्याबद्दल माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 

पुढील सभेत फक्त नाभिक व्यावसायिकांची व नाभिकेतर सलून व्यावसायिकांची सभा घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. जिल्हा सलून असोसिएशन स्थापन झाल्यानंतर तालुका असोसिएशन स्थापन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. 

सातरल गावातील नाभिक भगिनीला दुर्धर आजार झाल्यामुळे तिच्यासाठी मदतनिधी गोळा करणाऱ्या सर्व मदतीच्या हातांचे आभार मानण्यात आले. मदतीचा हात देणाऱ्या अडतीस देणगीदारांची नावे वाचून दाखविण्यात आली. अशाच प्रकारे भविष्यात कोणालाही गरजू नाभिक बांधवांना मदत देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष रोशन चव्हाण यांनी केले. नाभिक संवर्धन निधीबाबत सकारात्मक चर्चा झाली. 

कणकवली नाभिक संघटनेच्या महिला विभागाच्या वतीने लवकरच पूर्ण तालुका दौरा संपन्न होणार असल्याचे तालुका सरचिटणीस प्रवीण कुबल यांनी सांगितले. त्यासाठी प्रत्येक विभागातील अध्यक्ष आणि नाभिक बांधव यांनी तयारी दर्शविणे गरजेचे असल्याबद्दल चर्चा करण्यात आली. माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी यावर विशेष मार्गदर्शन केले. 

तालुकाध्यक्ष रोशन चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सभेतील सर्व विषयांचा धावता आढावा घेतला. ते म्हणाले , “ तालुक्यातील सर्व नाभिक बांधवांची मला साथ हवी आहे. तुमच्यामुळे मी तालुकाध्यक्ष झालो आहे हे मी कधीही विसरणार नाही. आपल्या तालुक्यात नाभिक बांधवांसाठी माझ्याकडून जेवढे विशेष प्रयत्न करता येतील तेवढे मी करणार आहे. तुम्ही मला एकीची साथ देत आहात म्हणूनच माझ्या हातून असे भव्य दिव्य कार्य घडू शकते. आपण सर्वांनी मिळूनच आपल्या नाभिक संघटनेला एका विशिष्ट उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करूया. ”

सभेमध्ये निलेश पांडुरंग चव्हाण आणि महादेव चव्हाण यांचे केक कापून वाढदिवस साजरे करण्यात आले. सभेला पन्नास पेक्षा जास्त नाभिक बंधू भगिनी उपस्थित होते. 

🔹लेखन : तालुका सरचिटणीस : प्रवीण अशितोष कुबल ( ९८८१४७१६८४ )







































































No comments:

Post a Comment

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...