Sunday, March 19, 2023

🌀 रोशन मनोहर चव्हाण यांची कणकवली नाभिक तालुकाध्यक्षपदी अभिनंदनीय निवड

 🌀 रोशन मनोहर चव्हाण यांची कणकवली नाभिक तालुकाध्यक्षपदी अभिनंदनीय निवड 

🍥 संजय कुबल झाले कार्याध्यक्ष तर निलेश चव्हाण उपाध्यक्ष 

🍩 कणकवली नाभिक संघटनेची नूतन कार्यकारिणी संपन्न 

🌍 कणकवली : नुकतीच कणकवली नाभिक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा अनिल अणावकर यांच्या कणकवली निवासस्थानी संपन्न झाली. त्यावेळी नूतन कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. सन २०२३ ते २०२६ या तीन वर्षांसाठी निवड करण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये तालुकाध्यक्ष म्हणून हरकुळ गावातील रोशन मनोहर चव्हाण व उपाध्यक्ष म्हणून सातरल गावचे निलेश पांडुरंग चव्हाण यांची सर्वानुमते अभिनंदनीय निवड करण्यात आली. 

तसेच इतर पदाधिकारी निवडण्यात आले. कार्याध्यक्ष संजय अनंत कुबल , तालुका सरचिटणीस प्रवीण कुबल , खजिनदार मनोज वसंत चव्हाण , तालुका सल्लागार लक्ष्मीकांत सुर्यकांत चव्हाण , कार्यालयीन चिटणीस राजेश चव्हाण , प्रसिद्धी प्रमुख प्रणय चंद्रकांत चव्हाण , कणकवली शहराध्यक्ष अनिल सहदेव शिंदे , कनेडी विभागीय अध्यक्ष प्रशांत अनंत चव्हाण , फोंडा विभागीय अध्यक्ष सुनिल चव्हाण , नांदगाव विभागीय अध्यक्ष श्रीकांत रमेश टाकळे , खारेपाटण विभागीय अध्यक्ष अनंत भिकाजी चव्हाण , तळेरे विभागीय अध्यक्ष समीर चव्हाण , ओसरगाव विभागीय अध्यक्ष नवनीत चव्हाण , महिला आघाडी तालुकाध्यक्षा तेजस्विनी तुळशीदास कुबल , कार्याध्यक्षा प्रिया दशरथ चव्हाण , उपाध्यक्षा रसिका रमेश आचरेकर , जिल्हा सदस्या रचना राजन चव्हाण , कोषाध्यक्षा अभिलाषा अनिल शिंदे , तालुका सल्लागार भक्ती विलास चव्हाण , महिला सरचिटणीस हेमांगी अणावकर आणि सहसचिव ईश्वरी प्रवीण कुबल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 

सदर सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा आणि विचार विनिमय करण्यात आला. मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्यात आले. जमाखर्च ताळेबंद सांगण्यात आला. कणकवली तालुका नाभिक बांधवांचे सर्व्हेक्षण करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याने दिलेल्या फॉर्मचे विभागवार वितरण करण्यात आले. 

नूतन जिल्हाध्यक्ष जगदिश चव्हाण यांनी सर्वांना विशेष मार्गदर्शन केले. नाभिक भवन संदर्भात जिल्हाध्यक्ष म्हणून मी जोमाने प्रयत्न करीन असे ते म्हणाले. त्यावेळी माजी जिल्हाध्यक्ष नाभिकरत्न अनिल अणावकर , जिल्हा सचिव सुधीर चव्हाण , जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण , जिल्हा सल्लागार सुभाष चव्हाण , माजी तालुका सचिव विलास चव्हाण , नंदू चव्हाण , नाभिकरत्न शरद लाड , जिल्हा महिला खजिनदार शिवानी चव्हाण , रमेश आचरेकर , दशावतारी कलावंत अनंत चव्हाण , फोंडा सचिव रोहिदास चव्हाण , माजी तालुका उपाध्यक्ष रवी चव्हाण , जिल्हा सदस्य रुपेश पिंगुळकर , मालवण उपाध्यक्ष संदीप चव्हाण , रविंद्र चव्हाण , संतोष कदम आणि कणकवली तालुक्यातील बहुसंख्य नाभिक ज्ञातीबांधव उपस्थित होते. माजी व नूतन पदाधिकाऱ्यांचे शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. तालुका सरचिटणीस प्रवीण कुबल यांनी सर्वांचे आभार मानले.












































































































No comments:

Post a Comment

🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय

🔴  कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय ​ कणकवली:   ...