🌐 सभेला एकूण ६० पेक्षा जास्त पुरुष व महिला सदस्य उपस्थित होते.
🌐 वार्षिक सर्वसाधारण सभा अजिंड्याप्रमाणे संपन्न झाली.
🌐 देहावसान झालेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
🌐 विषय क्र. १ ) मागील सभेच्या इतिवृत्ताला सर्वानुमते मंजुरी घेण्यात आली.
🌐 विषय क्र. २ ) कणकवली तालुका नाभिक संघटनेचे रितसर सभासद संख्या सांगण्यात आली. कणकवली तालुक्यातील एकूण कारागिर २०७ असून त्यांनी सर्वांनी संघटनेची वार्षिक वर्गणी भरण्याबाबत आवाहन करण्यात आले. सदस्यसंख्या वाढविण्यासाठी विभागिय अध्यक्षांनी विशेष लक्ष देऊन आपल्या विभागातील सदस्यांच्या वैयक्तिक भेटी घेऊन किंवा नियमित सकारात्मक संपर्कात राहून संघटनेत सक्रिय होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे ठरविण्यात आले. तसेच जिल्हास्तरावरुन मार्गदर्शन घेऊन २०२० ची वार्षिक वर्गणी जमा करणेसंदर्भात ठराव घेणेत आला. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
🌐 कोरोना कालावधीत संघटनेने केलेल्या तालुकास्तरावरील व जिल्हास्तरीय कार्याचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. त्यात कलेक्टर , पोलीस अधिकारी, प्रांताधिकारी , तहसिलदार, खासदार , आमदार यांना वेळोवेळी दिलेल्या पोहोच पत्रांचे वाचन करण्यात आले. राज्यस्तरावरुन केले जाणारे निवेदन वाचून दाखवण्यात आले. सर्व मागण्या स्पष्ट करण्यात आल्या. परप्रांतीय कारागिरांबाबत कणकवली पोलीस ठाणे येथून प्राप्त पत्राचे वाचन करुन समज देण्यात आली.
🌐 नवीन दुकानधारकांचे स्वागत करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. उदाहरणार्थ श्री. गणेश चव्हाण , श्री. रोशन चव्हाण आणि इतर नवीन प्रारंभ करणाऱ्या सलूनव्यावसायिकांनाही संघटनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
🌐 मागील जमाखर्चाचा हिशेब सांगण्यात आला. बँकखात्यामध्ये ३०१३६ रु. शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. झालेल्या खर्चास कार्योत्तर व पुढील संभाव्य खर्चासाठी कार्यपूर्व मंजुरी सर्वानुमते घेण्यात आली.
🌐 कोरोना कालावधीत घेतलेल्या Online सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या १८ सहभागी नाभिक कलाकारांना कणकवली नाभिक संघटनेच्या वतीने ' प्रशस्तिपत्रक ' देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
🌐 कोरोना अनलाॕक कालावधी सुरु झाल्यानंतरही आपल्याला सलूनांमध्ये अधिक काळजी घ्यावी लागण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. Use & throw चे साहित्य वापरण्याच्या सुचना संघटनास्तरावर वारंवार देण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष मा. अनिल अणावकर यांनी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. दराबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यावरुन दरपत्रक ठरविण्यात आल्यामुळे त्यात कोणताही बदल न करता दिलेले दर घेण्याबाबत स्पष्ट समज देण्यात आली. सदर दरफलक पुढील पाच वर्षांसाठी असल्याने त्यात बदल केल्यास आपले आपणच नुकसान करुन घेणार असल्याबाबत समज देण्यात आली. फोनवरून काही तक्रारी येत असल्याने पुन्हा तक्रारी आल्यास सदर व्यावसायिक नाभिक बांधवांना एकदा फोनवरून समज दिली जाईल. तरीही पुन्हा तक्रार आल्यास त्यांना लेखी स्वरुपात विनंती पत्र एकदा देण्यात येईल. त्यानंतरही त्यांच्यात बदल झाला नाही तर त्यांच्यावर संघटनात्मक चौकशी ला सामोरे जावे लागेल. त्यानंतर तो विषय जिल्हास्तरावर कळवला जाऊन त्यांच्या निर्णयाने पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सर्वानुमते ठरविण्यात आले. तसेच सर्व दुकानदारांनी संघटनेने पुरवलेला रंगीत दरफलक दर्शनीभागात लावण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
🌐 कणकवली तालुका नाभिक समाजातील दुर्धर आजारी असलेल्या बांधवांना तातडीची मदत देण्याच्या दृष्टीने ' नाभिक संवर्धन निधी ' गोळा करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा करण्यात आली. चर्चेअंती या पहिल्या वर्षी प्रतिसदस्य १०० रु. जमा करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. याबाबतचे निकष ठरवण्याबाबत विशेष कार्यकारिणी सभा घेण्याचे ठरले.
🌐 कणकवली तालुका नाभिक संघटना म्हणजेच ' महाराष्ट्र नाभिक महामंडळ ' रितसर राज्य , जिल्हा आणि तालुका या तीन स्तरावरील सदस्य होण्यासाठी सर्वांनी जिल्हा संघटनेच्या मार्गदर्शनानुसार पुढील आदेश आल्यानंतर वर्गणी भरणा करण्याबाबत सर्वानुमते ठरले.
🌐 ८ मार्च : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कणकवली महिला सेलच्या पदाधिकारी व सदस्या यांचा कणकवली तालुका विभागिय दौरा नियोजित असल्याने त्यावर चर्चा करण्यात आली. कनेडी, फोंडा , नांदगांव , तळेरे आणि खारेपाटण विभागातील अध्यक्ष आणि सचिव यांनी कणकवली तालुका सचिव यांना फोन करुन त्याबाबत आपापले नियोजन कळविण्याचे ठरले. त्यादिवशी सर्व विभागातील नाभिक महिला त्या त्या विभागात एकाच ठिकाणी एकत्र येण्याच्या दृष्टीने काही अडचणी असल्यास आधीच कणकवली सचिवांना फोन करुन सविस्तर कळवावे. त्यानंतर वर्तमानपत्रात किंवा प्रसिद्धीपत्रक काढून नियोजनाच्या वेळा कळवण्यात येतिल असे ठरले. तसेच कणकवली नाभिक संघटनेच्या वतीने २००० री. प्रवासखर्च देण्याचे सर्वानुमते मंजूर करण्यात आले. त्यापेक्षा जास्त प्रवासखर्च झाल्यास जादाची रक्कम पुढील सभेत मंजूर झाल्यानंतरच देण्याचे ठरले. दिलेल्या रकमेतून रक्कम उरल्यास ती संघटनेकडे परत करण्याबाबतही ठरवण्यात आले.
🌐 आयत्या वेळीचे विषय : कोणाचेही लेखी अर्ज नसल्याने चर्चा झाली नाही.
🌐 प्रसंगानुरुप व विषयाच्या अनुषंगाने नाभिक ज्येष्ठ निवृत्त मुख्याध्यापक मा. दिगंबर चव्हाणसर व माजी सचिव नाभिकरत्न मा. विलास चव्हाण यांनी आपली योग्य अशी मार्गदर्शनपर मते मांडली. संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. सर्व कणकवली तालुका सदस्यांनी याहीपेक्षा अधिक जोमाने सक्रिय होऊन संघटनेच्या विकासाला हातभार लावावा व पर्यायाने आपणही विकसित होण्याबद्दल जाणीवपूर्वक मार्गदर्शन करण्यात आले. महिला तालुकाध्यक्षा मा. संजना चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आपली महिला संघटना अधिक बळकट होण्यासाठी आपण पुढे होऊन प्रयत्न करु असेही त्यांनी सांगितले.
🌐 कणकवली सचिव यांनी सर्वांचे आभार मानले.
🟣 विशेष सुचना : मिटींगला अनुपस्थित असलेल्या सर्व सदस्यांनी पुढील सभेला आवर्जून उपस्थित राहण्याबाबत उपस्थित सदस्यांनी आग्रह धरल्याने कृपया पुढील सभेस सर्वांनी उपस्थित राहण्यासाठी कंपलसरी करण्यात आले आहे. ( आजारी सदस्य वगळून )
🟡 कणकवली तालुका नाभिक जनहितार्थ जारी










































No comments:
Post a Comment