आमदार वैभव नाईक यांना नाभिक संघटनेचे निवेदन सविनय सादर
शासनाकडील *नाभिक समाजाच्या प्रलंबित मागण्या* मंजूर करण्यासाठी आवाज उठवण्यासाठी आमदारांमार्फत पाठपुरावा करण्याची नाभिक संघटनेची राज्यभरातून निवेदने सादर
*कणकवली* दिनांक : २५ जानेवारी २०२१
सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या वतीने सर्व आमदारांना प्रलंबित मागण्यांविषयी आवाज उठवण्याच्या दृष्टीने नाभिक समाजाच्या प्रलंबित मागण्या लेखी निवेदनपत्राने सादर करण्यात आल्या.
निवेदन सादर करताना जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण , तालुका सदस्य दशरथ चव्हाण , जिल्हा सल्लागार सुभाष चव्हाण , केंद्रसंघटक अरुण चव्हाण , सचिव प्रवीण कुबल आदी उपस्थित होते.
आमदार वैभव नाईक म्हणाले , " कुडाळ विधानसभा मतदारसंघात नाभिक संघटनेची दोन गुंठे स्वतःची जागा असल्यास ' नाभिक भवन ' बांधकामासाठी पंधरा लाखापर्यंतचे सहकार्य देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करु. त्यासाठी जागा संघटनेच्या नावे विकत घ्या. "
*शासनाकडून प्रलंबित असलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :*
१ ) बारा बलुतेदारांच्या विकासासाठी बारा बलुतेदार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे व त्यास दरवर्षी पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
२ ) कोरोना कालावधीमध्ये आत्महत्याग्रस्त नाभिक समाजबांधवांस दहा लक्ष रुपये आर्थिक सहकार्य करण्यात यावे.
३ ) दिनांक २६ मार्च १९७९ च्या महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्राप्रमाणे नाभिक समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस करावी.
४ ) प्रतापगडावर शूरवीर जिवबा महाले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे व त्यासाठी निधीची तरतूद उपलब्ध करून द्यावी.
५ ) स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार क्रांतिवीर हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या नावाने बारा बलुतेदारांसाठी सबलीकरण योजना राबवावी.
६ ) रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करावी.
७ ) नाभिक समाजाच्या सलून कारागिरास दरमहा १५,००० रुपये निवृत्ती वेतन ( पेन्शन ) लागू करावी.
वरील मागण्या पूर्ण व्हायच्या असतील तर सर्व नाभिक बांधवांनी जागरुक झाले पाहिजे. सर्व नाभिक बांधवांनी संघटितपणे संघर्ष व पाठपुरावा केल्यास अशक्यप्राय गोष्टी शक्य होऊ शकतात.
©️ *सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक जनहितार्थ जारी*

No comments:
Post a Comment