आपले सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक मंडळाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष सन्माननीय अनिलजी अणावकरसाहेब यांचा वाढदिवस म्हणजेच प्रकट दिन आहे. त्यांना आजच्या दिवशी वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा . त्यांना त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे , समृद्धीचे , भरभराटीचे , आरोग्यसंपन्न व संघटनेला अधिकाधिक उंचीवर नेवून ठेवणारे जावो. त्यांनी आपल्या नाभिक संघटनेसाठी केलेले कार्य अनमोल असेच आहे. आर्थिक भुर्दंड सहन करत संघटनेला आज एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे महत्कार्य त्यांनी केलेले दिसून येते. आपल्या सोबत अनेक नाभिक बांधवांना सामावून घेत त्यांना आदरपूर्वक वागणूक देणारी त्यांची कामाची पद्धत वाखाणण्यासारखी आहे. नाभिक समाजासाठी ते झटून काम करताना दिसतात. नाभिक बांधवांनी नेहमी पुढे पुढे जात राहायला पाहिजे अशी त्यांची भावना नेहमीच राहिलेली आहे. पदरमोड करून संघटनेसाठी केलेले सहकार्य मोलाचे असेच आहे. आपल्याला मोठे म्हणावे यासाठी ते काम करत नाहीत तर संघटनेतील तळागाळातील कार्यकर्ता पुढे यावा यासाठी त्यांची कायमच इच्छा राहिलेली दिसून येते. जिल्हाचे काम करणे सोपी गोष्ट नाही. पण जीवाची व आपल्या धंद्याचीही पर्वा न करता ते जिल्हाभर आपल्या नाभिक बांधवांसाठी धावून जातात. त्यांच्या इतक्या ओळखी आहेत कि जिल्ह्यात त्यांना अनिल हेअर ड्रेसर्स या नावाने ओळखले जाते. त्यांच्या वडिलांनंतर ते जे त्यांच्या कामाचा वारसा पुढे चालवत आहेत त्यासाठी त्यांना आम्हा जिल्हा नाभिक बांधवांकडून मानाचा मुजरा आहे. त्यांनी आपले हे नाभिक कार्य असेच पुढे सुरु ठेवावे. त्यांना भालचंद्र महाराजांच्या कृपेने , भराडी देवीच्या आशीर्वादाने कधीही काहीही कमी पडू नये यासाठी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. HAPPY BIRTHDAY ANAVKARSAHEB . Wish You Many Many Happy Returns of the day .
कणकवली तालुक्यातील नाभिक बांधवांची हक्काची संघटना ..संत सेना महाराज प्रसन्न ....अभिमान आहे आम्हाला ...आम्ही नाभिक असल्याचा .
Subscribe to:
Post Comments (Atom)
🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय
🔴 कणकवली तालुका नाभिक संघटनेची वार्षिक सभा संपन्न; मानकरी नाभिकांचा सन्मान राखण्यासह नवीन कार्यकारिणीबाबत महत्त्वाचे निर्णय कणकवली: ...
-
-
🔴 कणकवलीत नाभिक संघटनेतर्फे सद्गुरूनाथ माऊली महाराज वाळुंजकर यांचा सन्मान कणकवली: कणकवलीचे परमहंस भालचंद्र महाराज यांचे पट्टशिष्य आणि वा...
-
🔴 कणकवली नाभिक संघटनेची कार्यकारिणी सभा उत्साहात 🔹 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि नवीन कार्यकारिणी निवडीवर चर्चा कणकवली: (प्रतिनिधी) कण...






No comments:
Post a Comment