कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या वतीने आणि कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या सौजन्याने कणकवली भालचंद्र महाराजांच्या भक्त निवासामध्ये महाराष्ट्र नाभिक महामंडळाची सिंधुदुर्ग शाखेची सहविचार सभा नुकतीच संपन्न झाली.
प्रारंभी सर्वांचे शाब्दिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर संत सेना महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नाभिक समाजातील निधन पावलेल्या व्यक्तींसाठी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचे राज्याध्यक्ष दिपक यादव यांचा जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण आणि कणकवली तालुका अध्यक्ष रोशन चव्हाण यांनी शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. नूतन सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश पिंगुळकर यांचाही शाल श्रीफळ देऊन कणकवली तालुका उपाध्यक्ष निलेश चव्हाण आणि कणकवली तालुका कार्याध्यक्ष संजय कुबल यांनी सन्मान केला. जिल्हा महिला अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांचा शाल व श्रीफळ देऊन कणकवली महिला तालुका अध्यक्षा तेजस्विनी कुबल यांनी सन्मान केला.
देवगड महिला अध्यक्षा मयुरी यादव , जिल्हा उपाध्यक्ष विवेक चव्हाण , मालवण माजी तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर , मालवण तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण , देवगड तालुकाध्यक्ष प्रमोद चव्हाण , कणकवली तालुकाध्यक्ष रोशन चव्हाण , जिल्हा महिला अध्यक्षा प्रतिभा चव्हाण , राज्य संघटक विजय चव्हाण इत्यादींनी आपली मनोगते व्यक्त केली.
दिपक यादव यांनी सलून ब्युटीपार्लर असोसिएशनच्या स्थापनेपासून सविस्तर माहिती दिली. असोसिएशनच्या माध्यमातून राबवत असलेल्या उपक्रमांचे उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केले. ते म्हणाले , " आपण सलूनमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अधिक वापर केला पाहिजे. नवनवीन संकल्पना समजून घेऊन ग्राहकाच्या खुश करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी असोसिएशनच्या सेमिनारमध्ये सहभागी झाले पाहिजे. "
त्यानंतर महाराष्ट्र नाभिक महामंडळाची घटना वाचून दाखविण्यात आली. राज्य संघटक विजय चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण यांच्याकडे घटनेची मूळ प्रत सुपूर्द केली. राज्य प्रदेश चिटणीस राजन पवार यांनी कणकवली तालुकाध्यक्ष रोशन चव्हाण यांच्याकडे घटनेची प्रत सुपूर्द केली. संघटनेच्या घटनेतील नियमानुसार संघटना पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे असे राज्य संघटक विजय चव्हाण म्हणाले.
त्यावेळी माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण , युवा जिल्हाध्यक्ष रुपेश पिंगुळकर , माजी जिल्हा सचिव सुधीर चव्हाण , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गणेश चव्हाण , कणकवली महिला कार्याध्यक्ष प्रिया चव्हाण , सहसचिव ईश्वरी कुबल , जिल्हा उपाध्यक्ष दाजी माने , सुनील न्हावेलकर , सहकार्य अध्यक्ष विठोबा चव्हाण , कुडाळ तालुकाध्यक्ष आनंद पिंगुळकर , सावंतवाडी तालुकाध्यक्ष सदानंद पवार , कणकवली शहराध्यक्ष अनिल शिंदे , फोंडा विभागीय अध्यक्ष सुनील चव्हाण , कनेडी विभागीय अध्यक्ष प्रशांत चव्हाण, ओसरगाव विभागीय अध्यक्ष नवनीत चव्हाण , अरुण चव्हाण , तालुका महिला सल्लागार भक्ती चव्हाण , तालुका महिला कोषाध्यक्षा अभिलाषा शिंदे , मालवण तालुका उपाध्यक्ष संदीप चव्हाण , संदेश चव्हाण , मनोज चव्हाण , जिल्हा महिला सदस्य शिवानी चव्हाण , महिला सदस्या चंदा चव्हाण , जय भवानी ग्रुपचे दशरथ चव्हाण , जिल्हा सदस्य किशोर लाड , गुरुदास चव्हाण , रामदास चव्हाण , शरद लाड आणि जिल्ह्यातील 70 पेक्षा जास्त नाभिक बांधव उपस्थित होते.
कणकवली तालुका नाभिक संघटनेचे तालुका सरचिटणीस प्रवीण कुबल यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.









































































No comments:
Post a Comment